ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खाजगीकरणाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य विद्युत कृती समिती संपावर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

 ब्रह्मपुरी :- ऊर्जा क्षेत्रातील खाजगीकरणाच्या विरोधामध्ये दिनांक ९,१०,११, ऑक्टोबर पासून तब्बल ७२ तासाचा म्हणजे तब्बल तीन दिवसाचा राज्यव्यापी संप सुरू झालेला आहे महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभयंते अधिकारी कृती समितीघ्या वतीने संप पुकारलेला आहे.

जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही असा पवित्रा सध्या संपकरी यांनी घेतला असून ब्रह्मपुरी विभाग कृती समितीच्या वतीने गुरुवार दिनांक ९ ऑक्टोबर रोजी रात्री 12 वाजता पासून अभियंते,अधिकारी. कर्मचारी यांनी संप पुकारला आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटनचे गडचिरोली सर्कल अध्यक्ष एल आय थाटकर, सर्कल उपाध्यक्ष राजेश मेश्राम, एस ई ए संघटनेचे कोलटवार, कामगार महासंघ संघटनेचे विवेक मोहनकर, फेडरेशन संघटनेचे अतुल नुगुरवार, मरामाविक संघटनेचे ब्रह्मपुरी विभाग अध्यक्ष विकास सेलोटे, विभाग सचिव केतुल नवघडे यांच्या सह कृती समिती अभियंते,अधिकारी व कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये