ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावतीकरांना पाहिजे आहे शिक्षित तरुण नगराध्यक्ष

स्ट्रॉ पोलच्या माध्यमातून शहरात सोशल मीडियावर पार पडले प्रातिनिधिक सर्व्हेक्षण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

सर्वाधिक मते “शहराची जाण असलेल्या शिक्षित तरुण उमेदवार” या पर्यायाला

        स्ट्रॉ-पोलच्या माध्यमातून शहरात सोशल मीडियावर एक प्रातिनिधिक सर्व्हेक्षण घेण्यात आले. या स्ट्रॉ-पोल सर्व्हे मध्ये सोशल मिडिया प्लॅटफॉर्म वर शेकडोंनी सहभाग घेतला. या सर्व्हेक्षण नुसार भद्रावतीकरांना “नविन शिक्षित तरुण” नगराध्यक्षपदी पाहिजे असल्याचे स्पष्ट झाले आहे. तीन दिवसात ८१ टक्के सहभागींनी शहराची जाण असलेला नविन शिक्षित तरुण यास भावी नगराध्यक्ष म्हणून पसंती दाखविली तर १९ टक्के सहभागींनी जुनाच राजकारणी तथा माजी पदाधिकारी नगराध्यक्ष म्हणून असावा, या पर्यायावर पसंती दर्शविली.

राज्यातील २४७ नगरपरिषदा व १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांच्या आरक्षण सोडत दिनांक ६ ऑक्टोबर ला निघाल्या. स्थानिक भद्रावती नगरपरिषद नगराध्यक्ष पदाकरीता ना.मा.प्र. (ओबीसी) सर्वसाधारण गटातून आरक्षण जाहीर झाले आहे. या अनुषंगाने शहरात नगराध्यक्ष पदाकरीता चाचपणी सुरु झाली आहे.

जुन्या सर्वच राजकीय नेतेमंडळींनी कंबर कसली असुन नव्याने जनतेसमोर जाण्याचे नियोजन करीत आहे. मात्र यात दोन मतप्रवाह शहरात प्रकर्षाने जाणवू लागले आहे. याबाबत गुगल स्ट्रॉ पोलच्या माध्यमातून शहरात सोशल मीडियावर एक सर्व्हेक्षण करण्यात आले. या सर्व्हेक्षण अंतर्गत भद्रावती नगरपालिका नगराध्यक्ष पदाकरीता कोणत्या प्रकारचा उमेदवार तुम्ही निवडाल? असा प्रश्न करण्यात आला व त्यात दोन पर्याय देण्यात आले.

पहिला पर्याय शहराची जाण असलेला नविन शिक्षित तरुण तर दुसरा पर्याय जुनाच राजकारणी माजी पदाधिकारी, असा होता. या सर्वेक्षणात अवघ्या कमी वेळात शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला. सर्वाधिक म्हणजे ८१% सहभागींनी पहिला पर्याय “शहराची जाण असलेला नविन शिक्षित तरुण” निवडला तर सर्वात कमी म्हणजे केवळ १९% सहभागींनी दुसरा पर्याय “जुनाच राजकारणी माजी पदाधिकारी” निवडला. या सर्व्हे मुळे शहराचा कल लक्षात आला असून नागरिकांना नव्या चेहऱ्याचा शोध असल्याचे दिसून येत आहे. नगरपालिकेची धुरा नविन चेहऱ्याकडे देण्याची जनतेची इच्छा या सर्व्हे मधुन दिसून आली आहे तर जुने राजकारणी, माजी पदाधिकारी जनतेच्या पसंतीस नाही, हे सुद्धा सर्व्हेतून दिसून आले आहे.

स्ट्रॉ पोल हे तात्पुरते किंवा अनधिकृत मतदान आहे. एखाद्या विशिष्ट विषयावर लोकप्रिय मत दर्शविण्यासाठी याचा वापर केला जातो आणि राजकारण्यांना बहुमताचे मत जाणून घेण्यास आणि मते मिळविण्यासाठी काय निर्णय घ्यावा, हे ठरविण्यास मदत करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. स्ट्रॉ पोल मोठ्या गटांमधील चळवळींमध्ये संवाद प्रदान करण्यासाठी वापरले जाते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये