संघ शताब्दी वर्षात संघकार्य अधिक गतीने करायचेय् : चिंतनभाई उपाध्याय

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी :- संघ स्वयंसेवकांनी आज देशातील विपरीत परिस्थितीवर मात करून संघाचे कार्य अधिक गतीने करायचे असून, संघ स्थापनेपासून हेच सुरू आहे. संघाच्या दैनिक शाखेतून घडत गेलेल्या संस्कारामुळेच आजवरची संघाची यशस्वी वाटचाल आहे संघशताब्दी वर्षातही संघ स्वयंसेवकांनी विचलीत न होता ठरवून दिलेले कार्यक्रम अधिकाधिक चांगले केले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र सह प्रचारक चिंतनभाई उपाध्याय पांनी केले.उत्सवा आधी भरपावसात स्वयंसेवकांचे नगरातून पथसंचलन निघाले. ब्रह्मपुरी संघ शाखेच्या तरुण स्वयंसेवकांच्या विजयादशमी उत्सवप्रसंगी ते संबोधित करत होते.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिधी प्रा. संतोष मेश्राम, विभाग संघचालक जयंत खरवडे, नगर कार्यवाह स्वप्निल माकोडे उपस्थित होते.चिंतनभाई उपाध्याय म्हणाले, संघ हे समाजाचे संघटन आहे. त्यामुळे स्वयंसेवकांनी समाजाला सोबत घेऊन कार्य केले पाहिजे.विविध कार्यक्रमांद्वारे हिंदुत्वाचे जागरण व शक्तीची उपासना करत समाज परिवर्तनाचे कार्यक्रम समाजशील उपक्रम म्हणून अधिक
जोमाने पूर्ण केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले प्रा. संतोष मेश्राम यांनी विजयादशमीच्या महत्त्वावर प्रकाश टाकताना सांगितले विजयादशमीच्या शक्ती उपासना पर्वावर डॉ. हेडगेवार पांनी संघाची स्थापना करून हिंदुत्व जागरणाचा मंत्र दिला आणि तो सातत्याने जपणे हीच संघाची परंपरा आहे.
प्रारंभी स्वागत प्रणाम, शस्त्र पूजन, ध्वजारोहण, प्रार्थना झाल्यावर नगर कार्यवाह यांनी प्रास्ताविकातून पाहुण्यांचा परिचय करून दिला. अमृतवचन नितीन आंभोरकर, सुभाषित भगवान बोरकर, तर वैयक्तिक गीत मिनानाथ येलतुरे यांनी सादर केले. ध्वजावतरणाने उत्सवाची सांगता झाली. मुसळधार पावसामुळे स्थळ बदलावे लागले असले तरी कार्यक्रम ठरल्याप्रमाणे उत्साहात संपन्न झाला