गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैधरित्या चोरटी रेतीची वाहतूक

एकूण 14 लाख 46 हजाराचा माल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन पुलगाव ची कारवाई- दिनांक 03/04/2024 रोजी रात्री 01.45 वा. दरम्य़ाण मुखबीर कडून मिळालेल्या खबरेवरुन पंच व पो.स्टॉफ यांचे मदतीने वर्धा-पुलगाव हायवे रोडवर सी.ए.डी.रेल्वे गेट,जवळ पुलगाव कडे खबरेप्रमाणे टिप्पर क्रमांक MH 32 AJ 3919 हा अवैद्यरित्या रेतीची (गौणखनिज) चोरी करून वाहतूक करीत येत आहे अशा खबरेवरून नाकेबंदी केली असता खबरेप्रमाणे असणारा टिप्पर क्रमांक MH 32 AJ 3919 हा वर्धा कडून पुलगाव कडे येतांना दिसला त्या टिप्पर ला थांबवून सदर टिप्परची पाहणी केली असता.,

टिप्परमध्ये रेती (गौणखनिज) भरून दिसल्याने टिप्पर चालक यांस त्याचे नांव पत्ता विचारला असता त्याने निलेश प्रभाकर लसुंते वय 28 वर्ष रा.बोरवघळ,ता.धामणगाव (रेल्वे),जि.अमरावती असे सांगीतल्याने त्यास सदर टिप्पर मधील रेती कोठून आणली व कोणाची आहे, रेती वाहतूकीबाबत परवाना (राँयल्टी) आहे काय असे विचारले असता टिप्पर चालक याने सदर टिप्पर व रेती ही संतोष पनपालीया रा.आर के काँलनी पुलगाव यांची आहे मी मजुरीने चालक म्हणून त्याचेकडे कामावर आहे व सावंगी रेती घाट (आजनसरा) येथून रेती (गौणखनिज) आणली असून रेती वाहतुकीचा कोणताही परवाना (राँयल्टी) नसल्याचे सांगीतले त्याचे ताब्यातून (1) रेती (गौणखनिज) अंदाजे 4 ब्रास किंमत 24000/- रू. (चोवीस हजार रूपये), (2) एक जुने वापरते टिप्पर क्र.MH 32 AJ 3919 किं.14,00,000/-रू.(चौदा लाख रूपये), (3) टिप्पर चालक निलेश प्रभाकर लसुंते याचे अंगझडतीत एक विवो वाय 200 5G कंपनिचा मोबाईल किं.22000/-रू.(बावीस हजार रूपये) असा एकूण जु.किं.14,46,000/-रू.(चौदा लाख छेचाळीस हजार रूपये) चा माल पंचासमक्ष जप्त केला.

  सदर टिप्पर क्रमांक MH 32 AJ 3919 चा मालक नामे संतोष पनपालीया रा.आर के काँलनी पुलगाव याने टिप्पर चालक निलेश प्रभाकर लसुंते याचे मदतीने विनापास परवाना अवैद्यरित्या रेतीची (गौणखनिज) संगणमताने चोरी करून चालक निलेश प्रभाकर लसुंते याचे मदतीने वाहतुक करतांना मिळून आल्याने दोन्ही आरोपीतांविरूध्द गुन्हा नोंद असून पुलगाव पोलीस अधिक तपास करीत आहे.

         सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. नरुल हसन सा.,अप्पर पोलीस अधिक्षक श्री.सागर कवडे सा.,उपविभागीय पोलीस अधिकारी पुलगाव IPS राहुल चव्हाण सा.पो.नि.श्री राहुल सोनवणे सा.पो.स्टे पुलगाव यांचे मार्गदर्शनात,पोलीस उपनिरीक्षक. संदीप चव्हाण, पो.हवा/रितेश गुजर, शरद सानप,शुभम कावळे, प्रणय इंगोले यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये