ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोडशी बू येथील शेतशिवारात जनावराच्या गोठ्याला आग

शेतकऱ्याचे मोठे नुकसान ; दोन जनावरे जखमी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

कोरपना तालुक्यातील कोडशी बुद्रुक येथील एका शेत शिवारात अचानकरित्या लागलेल्या आगीत जनावराच्या गोठ्यासह शेती उपयोगी साहित्याची राख रांगोळी झाली. तसेच या आगीत होरपळून दोन जनावरे गभिर रित्या जखमी झाली.ही घटना शुक्रवार दिनांक पाचला दुपारी एक वाजून तीस मिनिटाच्या दरम्यान घडली.

हेटी येथील शेतकरी जगदीश नामदेव जरीले यांच्या मालकीचा कोडशी बू शेतशिवारात हा जनावराचा गोठा आहे. यात अचानक रित्या लागलेल्या आगीमुळे शेत शिवार फाटा, कडबा, शेती अवजारे संपूर्णतः जळून खाक झाली. तर

दोन जनावरे या आगीत होरपळून जखमी झाली. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. यात संपूर्ण पनास हजार च्या जवळपास चे आर्थिक नुकसान झाले. या अनुषंगाने महसूल व पोलीस विभागाकडून पाहणी करून प्रत्यक्ष पंचनामा करण्यात आला. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये