ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नैसर्गिक आपत्तीचे अनुदान तात्काळ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी कार्यवाही करावी

तहसिलदारांचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीचे अनुदान वाटप नोव्हेंबर 2023 मधील ऑनलाईन डी बी टी द्वारे लाभार्थी यांच्या आधार लिंक खात्यात थेट अनुदान जमा होत आहे,तथापि काही लाभार्थी खातेदार यांना विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे, लाभार्थी यांना येणाऱ्या अडचणी करिता तहसिल कार्यालया मार्फत काही उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

खातेदार शेतकऱ्यांना विशिष्ठ क्रमांक, व्हीं के नंबर मिळाल्यानंतर त्यांनी आधार प्रमाणीकरण करण्यासाठी जवळच्या महा ई सेवा केंद्र किवा आपले सरकार केंद्रामध्ये आधार कार्ड,बँक पासबुक व 7/12 घेऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, आधार प्रमाणीकरण होत नसल्याची तक्रार आल्यास संबंधित लाभार्थी खातेदार यांनी महा ई सेवा केंद्र किंवा आपले सरकार केंद्रावरून मिळालेली पोच पावती सोबत आधार कार्ड,बँक पासबुक झेरॉक्स तलाठी कार्यालयात किंवा तहसिल कार्यालयात सादर करावी ,कारण सदरची तक्रार पंचनामा पोर्टल वरील Grievances Tab वरून निकाली काढल्या शिवाय यांच्या खात्यात अनुदान जमा होणार नाही,ज्या लाभार्थी खातेदार यांचे बोटाचे ठसे उमटत नसल्यास E KYC Not Possible’ ही Grievances Type निवडावी.

आधार प्रमाणीकरण करण्यासाठी मयत व्यक्तीच्या नावाने विशिष्ठ क्रमांक आल्यानंतर एका वारसांच्या नावाने पैसे काढण्यासाठी ईतर वारसाची हरकत नसल्याचे संमतीपत्र, आधार कार्ड,बँक पासबुक,घेऊन महा ई सेवा केंद्र किंवा आपले सरकार केंद्रावर जाऊन Grievances Type 6, ही निवडल्यानंतर सदरची तक्रार तहसीलदार लॉगिन मधील तक्रार पोर्टल वर दिसेल,सर्व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर तक्रार निकाली काढण्यात येईल, तसेच सदर वारसाने पुन्हा महा ई सेवा केंद्र किंवा आपले सरकार केंद्रावर जाऊन त्यास विशिष्ठ क्रमांकाला आधार प्रमाणीकरण करण्यात यावे.

आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर सुद्धा काही लाभार्थी खातेदार यांचे पेमेंट काही कारणामुळे रिजेक्ट झाल्याचे दिसून येते लाभार्थी खातेदार यांचे आधारला दहा वर्षे झाले असून त्यांनी त्या आधार मध्ये कोणतेही अपडेट केलेले नाही तर सर्वप्रथम त्यांनी आपल्या जवळच्या आधार केंद्रातून आधार बायोमेट्रिक अपडेट करावे, त्यानंतर बँकेत जाऊन आधार लिंक बँक seeding NPCI करून घ्यावे असे केल्यावर शासन स्तरावरून पैसे आपोआप सदर आधार लिंक खात्यात जमा होईल. आधार अपडेट केल्यानंतर काही दिवसांनी बँकेत जाऊन आधार लिंक बँक सीडींग करणे आवश्यक आहे.लाभार्थी खातेदार यांना नैसर्गिक आपत्ती अनुदान नोव्हेंबर 2023 बाबत काही अडचणी आल्या तर त्यांनी आपल्या गावच्या तलाठी यांच्याकडे चौकशी किंवा तक्रार सादर करावी.तसेच सामाईक खातेदार किंवा बाहेर गावी राहणारे खातेदार यांनी अद्याप तलाठी कार्यालयात बँक तपशील, आधार कार्ड व संमती लेख सादर केला नसल्यास त्यांनी तात्काळ तलाठी यांच्याकडे सादर करावे जेणेकरून लाभार्थी खातेदार अनुदानापासून वंचित राहणार नाही, असे तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांनी कळविले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये