ताज्या घडामोडी

भाजपा तालुकाध्यक्षांचा भिषण अपघातात जागीच मृत्यू – ग्रामीण भागातील युवा नेतृत्व गमावले

प्रशांत येल्लेवार ह्यांच्या निधनाने गोंडपिपरी तालुक्यात शोककळा

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

भारतीय जनता पक्षाचे गोंडपिपरी तालुका अध्यक्ष प्रशांत येल्लेवार ह्यांचे राजुरा येथिल चंद्रपूर टी पॉइंट जवळ झालेल्या भिषण अपघातात जागीच मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना सकाळी 10:45 वाजताच्या सुमारास घडली. हा अपघात इतका भिषण होता की क्र. MH 34 BG 1310 क्रमांकाच्या ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने त्यांच्या डोक्याच्या भागाचा चेंदामेंदा झाला.

प्राप्त माहितीनुसार प्रशांत येल्लेवार गोंडपिपरी येथुन मागील दोन दिवसांपासून मावसभावाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी सहपरिवार राजुरा येथे आले होते. मात्र आज नेमक्या लग्नाच्या दिवशीच झालेल्या भिषण अपघातात त्यांचे निधन झाले.

गोंडपिपरी तालुक्यातील सर्वसमावेशक युवा नेतृत्व म्हणून त्यांचेकडे बघितल्या जात होते. भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष असले तरीही सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. तालुक्यातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी ते नेहमीच तत्पर असायचे मात्र सकाळीच झालेल्या त्यांच्या दुर्दैवी अपघाती निधनाने गोंडपिपरी तालुक्यावर शोककळा पसरली आहे. प्रशांत येल्लेवार ह्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व लहान लहान दोन अपत्य असुन त्यांच्या निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये