ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे ‘सामाजिक उपक्रमात आवड निर्माण करणारी चळवळ – राजू इंगोले 

नांदोरा येथे रासेयो श्रमसंस्कार शिबिर संपन्न 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

देवळी : ‘आजच्या धावपळीच्या जीवनात सामाजिक जाणीव व जबाबदारी याकडे दुर्लक्ष होत असून भावनाशून्य व्यक्तिमत्त्व विकसित होत आहे. म्हणून महाविद्यालयीन जीवनातच योग्य संस्कार रुजविण्याची नितांत गरज असून याकरीता अभ्यासासोबतच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून त्यात तरूण पिढीला सहभागी केले गेले पाहीजे. या दृष्टिकोनातून राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे सामाजिक उपक्रमात आवड निर्माण करणारी चळवळच आहे, असे प्रतिपादन नांदोरा ग्रामचे उपसरपंच राजू इंगोले यांनी स्थानिक एस. एस. एन. जे. कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिराच्या समारोप प्रसंगी 5 फेब्रुवारी रोजी केले.

श्रमसंस्कार शिबिराच्या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे कार्यक्रम अधिकारी कॅप्टन प्रा.मोहन गुजरकर तर प्रमुख अतिथी म्हणून नांदोरा ग्रामचे उपसरपंच राजू इंगोले, सह-कार्यक्रम अधिकारी प्रा जगदीश यावले, सह-कार्यक्रम अधिकारी प्रा. ममता पिलेवान, जेष्ठ नागरिक मनिष देशमुख, प्रहार समाज जागृती संस्थेचे सचिव संतोष तुरक, रासेयो स्वयंसेवक प्रतिनिधी प्रणव मेश्राम व वैष्णवी कन्नाके मंचावर उपस्थित होते.

सदर शिबिर 31 जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान आयोजित असून यात 55 स्वयंसेवकांनी भाग घेऊन ग्राम स्वच्छता अभियान, पाणी वाचवा प्रकल्प, व्यसनमुक्त ग्राम, मतदार जनजागृती व फिट इंडिया या उपक्रमात सहभागी झाले. पथनाट्य व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून ‘मतदार राजा जागा हो!’ व ‘स्वच्छ ग्राम सुंदर ग्राम’ हे संदेश ग्रामवासीयांपर्यत पोहचवला.

या श्रमसंस्कार शिबिराची विशेषता म्हणजे शिबिरार्थ्यांची निवास व्यवस्था ‘आर्मीच्या तंबूमध्ये’ करण्यात आली होती.

शिबिरादरम्यान बौद्धिक सत्रात प्राचार्य डॉ.प्रभाकर ढाले यांनी ‘रासेयो उपक्रमातून व्यक्तिमत्त्व विकास’, प्रा संतोष मोहदरे यांनी ‘योगा व व्यायामाचे महत्व’, प्रा. विवेक देशमुख यांनी ‘शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप’,प्रा. निलीमा बर्गट यांनी ‘पुष्प रचना’ कौशल्य, प्रा. स्वाती पातुरकर व प्रा. मनिषा किटे यांनी ‘ड्रेस डिझायनिंग’ – स्वयंरोजगार’, स्काऊटचे जिल्हा संघटक नितेश झाडे यांनी ‘स्काऊट चळवळीतून व्यक्तीमत्व विकास’, संतोष तुरक यांनी ‘आपत्ती व्यवस्थापन’, प्रा. गोंडे यांनी ‘स्पर्धा परीक्षेची तयारी’, प्रा. सुनिता गजभिये व प्रा. सपना गजभिये यांनी ‘गृह व्यवस्थापन’, प्रा. पुनम ठाकरे मॅडम यांनी ‘सामाजिक उपक्रमांचे आयोजन’, मानीक सिंगन यांनी ‘संवाद कौशल्य’, नितीन फासगे यांनी ‘मुलाखत तंत्र’, प्रा. वंदना तलमले यांनी ‘मराठी भाषेचे महत्त्व’ व प्रा. मेघा फासगे यांनी ‘स्वयंरोजगाराच्या विविध योजना’ या विषयावर मार्गदर्शन केले.

शिबिरात रासेयो स्वयंसेवकांना ‘पुर परिस्थिती व आग नियंत्रण परीस्थितीत बचाव’ मोहिमेबाबत सिनिअर अंडर ऑफिसर शेखर भोगेकर, अंडर ऑफिसर अक्षय जबडे, प्रतीक क्षीरसागर, प्रशिल अंदुरकर, साहील रामगडे व एन.सी.सी.छात्र सैनिकांच्या चमूने ‘आपत्ती व्यवस्थापनाचे’ प्रात्यक्षिक व प्रशिक्षण दिले.

समारोप कार्यक्रमाचे संचालन कु. रूचीका काबंळे व गायत्री सातपुते यांनी तर आभार प्रिती मेश्राम हिने मानले. यशस्वीतेकरीता स्नेहा मडकाम, ईश्वरी परचाके, प्रतीक्षा पाटमासे, समिक्षा मराठे, पायल चौके, गौरी खडसे, भुमीका कापसे, आचल नेहारे, निखील मेश्राम, आकाश कन्नाके, सार्थक गावंडे, अस्मिता दडांजे व रासेयो स्वयंसेवकांनी प्रयत्न केले.

शिबिराचा समारोप ‘बदली में चमकेगा मंजील का तारा, तुफा में हमको मिलेगा किनारा…..या युवागीताने झाला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये