ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रपिता म. गांधीं विरुद्ध आक्षेपार्ह विधानावरून सिंदेवाही काँग्रेस आक्रमक…

संभाजी भिडे वर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून अटक करण्याची मागणी

चांदा ब्लास्ट

देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात आपल्या मवाळ भूमिकेतून इंग्रजांना “चले जाओ’ च्या  घोषणेतून सळोकी पडू करून सोडणारे अहिंसेची पुजारी देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या कुटुंबावर अमरावती येथील व्याख्यान कार्यक्रमात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या तसेच सामाजिक तेढ निर्माण करू पाहणाऱ्या मनोहर उर्फ संभाजी भिडे याने संपूर्ण देश वासियांच्या भावना दुखावल्या असून संभाजी भिडे वर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्वरित अटक करण्याच्या मागणीवरून आज स्थानिक शिवाजी चौकात सिंदेवाही तालुका काँग्रेसच्या वतीने निषेध नोंदवत आंदोलन करण्यात आले.
एकीकडे केंद्र व राज्य सरकार देशात वाढती महागाई , बेरोजगारी, धर्मांधता व धार्मिक तेढ निर्माण करून संपूर्ण देश खड्ड्यात लोटण्याचे काम करीत आहे. यात सर्वसामान्य गोरगरीब कुटुंब यांची मोठ्या प्रमाणात कुचंबना होत असताना देशातील ज्वलंत प्रश्नाबाबत आपले अपयश लपविण्यासाठी संभाजी भिडे सारख्या राजकीय कम सामाजिक संघटनेचे पांघरून ओढून अंतर्गत कलह निर्माण करणे हेतू सोडलेल्या प्यादयाच्या माध्यमातून समाजात प्रक्षोभक भाषणातून समस्यांकडून लक्ष विचलित करण्यासाठी विविध ठिकाणी सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचाच प्रत्यय आता अमरावती शहरातून आला असून काल अमरावती शहरांमध्ये आयोजित व्याख्यान कार्यक्रमात मनोहर उर्फ संभाजी भिडे यांने आपल्या व्याख्यानात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे कुटुंबाबद्दल आक्षेपार्ह विधान करून जनभावनेचा अनादर करीत बेताल वक्तव्य केले. या वक्तव्यामुळे संपूर्ण देश पेटून उठला असून याचे तीव्र पडसाद सर्वत्र निदर्शनास येत आहे.
तर अशा देशद्रोही व सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तींची सरकारकडून पाठराखन केल्या जात असून इतर शहरातही होऊ घातलेल्या वाख्यान कार्यक्रमाकरिता भाषणाची संधी सरकारकडून उपलब्ध करून दिल्या जात आहे. अहिंसेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधी हे देशाचे थोर नेते असून संपूर्ण भारत देशाचे आदर्श आहेत. अशा आदर्श व थोर महात्म्यांवर सूडबुद्धीने आक्षेपार्ह विधान करणे म्हणजे आकाशावर थुंकण्याची मजल मारणे होय. अशा तीव्र शब्दात आज सिंदेवाही येथील स्थानिक शिवाजी चौकात राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या आदेशानुसार निषेध नोंदवत स्थानिक तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी तालुका काँग्रेस कमिटीचे प्रमुख पदाधिकारी, महिला काँग्रेस कमिटीचे प्रमुख पदाधिकारी, युवक काँग्रेस कमिटी पदाधिकारी, तथा काँग्रेस पक्षाच्या सर्व तालुका फ्रंटल ऑर्गनायझेशनचे प्रमुख पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये