ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चांदा पब्लिक स्कूल येथे स्व. श्री. संजय श्रीहरी जीवतोडे यांना भावपूर्ण आदरांजली 

चांदा ब्लास्ट

चांदा पब्लिक स्कूल येथे दि. 22/03/2024 ला शाळेचे संस्थापक श्री. संजय श्रीहरी जीवतोडे यांचा 54 वा जन्मदिन साजरा करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जीवतोडे तसेच शाळेच्या प्राचार्या  आम्रपाली पडोळे उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरूवात ‘ये मत कहो खुदासे…….’ या गीतासमवेत श्री. संजय श्रीहरी जीवतोडे यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून करण्यात आली. काही व्यक्ती आपल्या कर्तृत्वाने कायमस्वरूपी लोकांच्या मनात आपलं घर करून जातात. यापैकीच एक व्यक्तिमत्व म्हणजे श्री. संजय श्रीहरी जिवतोडे हे होते. कुशल संघटक, लोकप्रिय युवानेते, निपून प्रशासक, समाजसेवी प्रतिमा म्हणून त्यांची ख्याती होती. फारच कमी वेळात ते उच्च पदावर आरूढ झालेत. शैक्षणिक क्षेत्रात होणारे नवबदल लक्षात घेवून चांदा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना त्यांनी उच्च दर्जाच्या शैक्षणिक सुविधांची संधी प्राप्त करून दिली. त्यांच्या स्वप्नांना मूर्तरूप देण्यासाठी त्यांच्या पत्नी श्रीमती स्मिता संजय जीवतोडे यांनी अहोरात्र परिश्रम घेउन विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास केंद्रस्थानी ठेवून शाळेत अॅक्टीविटीबेस लर्निंग सुरू केले. तसेच एड्यु-फिस्ट च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासा सोबतच शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्यांकरिता विशेष वर्गांचे आयोजन करून शाळेचा नावलौकिक वाढविला.

यावेळी शिक्षिका निलीमा पाऊनकर यांनी संजय सरांच्या स्मृतींना उजाळा दिला. तद्वतच शाळेच्या प्राचार्या सौ. आम्रपाली पडोळे श्री. संजय श्रीहरी जीवतोडे यांना श्रद्धांजली देत म्हणाल्या की, संजय सर आमचे प्रेरणास्थान आहे. ते आज नसूनही आमच्यात सदैव आहे. त्यांच्या अथक परिश्रमाने उभारलेल्या चांदा पब्लिक स्कूल चे रूपांतर आज वटवृक्षात झालेले आहे. त्यांच्या आशिर्वादाची आम्हाला नेहमीच अनूभूती होत असते.

शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जीवतोडे यांनी संजय सरांच्या गतस्मृतींना उजाळा देत त्यांच्या विद्यार्थ्यांना सर्व सुविधा व चांगल्या शिक्षणाचा दर्जा प्राप्त करून देण्याच्या स्वप्नांची स्वप्नपूर्ती करण्यास आम्ही अहोरात्र प्रयत्न करू असे वक्तव्य केले.

कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थ्यांसमवेत शिक्षिका मेघा शुक्ला तर आभार प्रदर्शन वंदना बोरसरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कार्यक्रम प्रमुख रेवती बडकेलवार, शाळेचे पर्यवेक्षक महेश गौरकार, सौ. शिल्पा खांडरे, सौ. वंदना बोरसरे, सौ. स्मृती मून तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये