ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्राचार्य योगेश गोनाडे यांना बहुजन समाज पार्टीची उमेदवारी जाहीर.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे

गडचिरोली -चिमूर लोकसभे करिता बहुजन समाज पार्टीने आपला पहिला उमेदवार जाहीर केला आहे. चिमूर -गडचिरोली मतदार संघ (अनु जमाती )करिता राखीव असून मागील २०१९च्या निवडणुकीत भाजपाने ७७०००/मते घेऊन विजय मिळवीला होता मात्र भाजपाने उमेदवारी जाहीर केली नाही यामुळे आणि वंचित बहुजन आघाडी न झाल्याने अनेक राजकीय पक्षात तिकीट मिळविण्यासाठी धावपळ सुरु आहे. मात्र नुकतेच सेवानिवृत्त झालेले प्राचार्य योगेश गोनाडे यांनी बहुजन समाज पार्टी (बी एस पी ) पक्षांकडे मागणी केली असता त्यांना विदर्भातील पाहिली तिकीट जाहीर झाली असून अन्यायाग्रस्त आदिवासी समाज आणि बहुजन समाज एकवटून तिसरी आघाडी समजून पहिले जात आहे.

प्राचार्य योगेश गोनाडे शिवसेना (उ बा ठा )गटाचे पदाधिकारी होते. त्यांनी पक्षांकडे मागणी केली होती परंतु त्यांना तिकीट मिळणार नाही हे लक्षात येताच महाराष्ट्र प्रभारी खा बहुजन समाज पार्टी नागपूर यांचेकडे मुलाखत देत पार्टीने उमेदवारी जाहीर केल्याने गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्रात तिहेरी लढतीचे चित्र पाहवयास मिळतील. माजी खासदार अशोक नेते यांनी गेल्या १०वर्षात काय? केलं हे आता सांगण्याची वेळ आली असल्याचे उमेदवार प्राचार्य योगेश गोनाडे यांनी एका वार्तालाप कार्यक्रमात सांगितले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये