ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मेहुणा राजा येथे संत चोखामेळा यांचा 756 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा

विविध विकास कामांचे भूमिपूजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 पश्चिम विदर्भातील मेहुना राजा हे संत पिठापैकी म्हणून एक अग्रस्थानी ओळख आहे येथील संत चोखामेळा यांच्या जन्मस्थळाच्या विकासासोबत हा परिसर विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व्यापक प्रवाहात यावे अशी मागणी गेल्या कित्येक वर्षापासून होती, त्याला यावर्षी शासनाकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला असून साडेतीन कोटी रुपयाचा विकास निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला असून यातील पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते पार पडले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक कमलेश खिल्लारे होते त्यांनी जन्मोत्सव हा लोकांचा उत्सव व्हावा असे सांगितले

  महाराष्ट्रातील प्रमुख संतापैकी असलेल्या संत चोखामेळा यांची ओळख आहे यांचा 756 वा जन्मोत्सव सोहळा मेहुना राजा येथे त्यांच्या मूळ गावी पार पडला पंचक्रोशीतून आलेल्या भाविकांच्या उपस्थितीत जन्मोत्सव सोहळा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सकाळी साडेसात वाजता कार्यक्रमाची महापूजेने सुरुवात करण्यात आली त्यानंतर साडेआठ वाजेच्या दरम्यान गावामधून पालखी मिरवणूक काढण्यात आली त्याची सांगता झाल्यानंतर अकरा वाजता जन्मस्थळी स्वागत समारंभ महाप्रसादाचे वितरण करण्यात आले

 संत चोखामेळा यांच्या 756 व्या जन्मोत्सवानिमित्त मेव्हणा राजा येथे जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने सदरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

 यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार, शिक्षण अधिकारी प्राथमिक बी आर खरात, गटविकास अधिकारी मुकेश माहूर, उपकार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम बालाजी का बरे, गटशिक्षणाधिकारी दादाराव मुसदवाले, केंद्रप्रमुख बबनराव कुमठे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक जाधव, तालुका आरोग्य अधिकारी उबाळे, पशुधन विकास अधिकारी डॉक्टर संदीप कुमार उदार, यांच्यासह

 मेव्हणा राजा चे सरपंच मंदा बोंद्रे, उपसरपंच साहेबराव काकडे, यांची सकाळी महापूजेला प्रमुख उपस्थिती होती

 महापूजेने जन्मोत्सवास सुरुवात झाली

  दरवर्षीप्रमाणे 14 जानेवारी रोजी महापूजा ने सदर जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ झाला सकाळी साडेसात वाजता जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महापूजा करून संत चोखामेळा यांच्या जन्मस्थळी आरती केली त्यानंतर गावातून पालखी मिरवणूक काढण्यात आली पालखी जन्मस्थळी जाण्याच्या वेळी आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी संत चोखोबाची पालखी खांद्यावर घेतली यावेळी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष गंगाधर जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर रामप्रसाद शेळके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती समाधान शिंगणे, गजानन पवार, गणेश सवडे,राजीव शिरसाट, राजू चित्ते, प्राध्यापक कमलेश खिल्लारे, सरपंच मंदा बोंद्रे,उपसरपंच साहेबराव काकडे, ग्रामसेवक मदन वायाळ, सह परिसरातील भाविक सावरकरी मुलांची प्रमुख उपस्थिती होती

 *अनेक मान्यवरांनी घेतले दर्शन*

 जन्मोत्सव सोहळा निमित्त माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, माजी आमदार तोताराम कायंदे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा रेखाताई खेडेकर, आधीच दिवसभर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी समाधीस्थळी येऊन दर्शन घेतले

 *यांनी केली सकाळी सहपत्नीक पूजा*

 सकाळी सूर्योदय समय संत चोखा महाराजांची महापूजा पार पडली यावेळी जिल्हा परिषदेचे तसेच तालुका पातळीवरील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते त्यांच्यासह माजी आमदार शशिकांत खेडेकर यांनी पत्नी उषाताई खेडेकर, तसेच डी टी सिपणे शिवसेना ज्येष्ठ नेते त्यांच्या पत्नी शीला ताई सिपने यांच्यासह गावच्या सरपंच मंदा बोंद्रे उपसरपंच यांनी सपत्नीक पूजा केल्या,

 *जन्मस्थळे विविध विकास कामांचे भूमिपूजन*

 सकाळच्या कार्यक्रमा मध्ये आमदार राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते साडेतीन कोटी रुपयाचे विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले सदरचा निधी हा जिल्हा परिषदेला प्राप्त झालेला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आले यामध्ये भव्य असे मंदिर भक्तनिवास सभामंडप स्वच्छालय आदी कामांचा समावेश आहे

 तर दुसऱ्या टप्प्यामध्ये चार कोटी बत्तीस लाखाच्या विविध प्रशासकीय कामांना मान्यता देण्यात आलेली आहे निधी प्राप्त झाल्यानंतर सदर काम सुरू करण्यात येतील अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली

 *मुख्य कार्यक्रमाला आमदारांची अनुपस्थिती*

 जन्मोत्सव सोहळ्यात सकाळी साडेदहा वाजता विभागाचे आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते परंतु भूमिपूजन झाल्यानंतर तसेच थोडाफार सहभाग नोंदवल्यानंतर त्यांना विशेष सभेसाठी जावे लागले त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान चोखामेळा या महान संतावर इतिहास संशोधन करणारे प्राध्यापक कमलेश खिल्लारे यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे देण्यात आले

 परंतु आमदार शिंगणे गेल्यानंतर राष्ट्रवादीचे एकही पदाधिकारी कार्यक्रम स्थळी थांबलेले नाहीत त्यामुळे गावकऱ्यांसह भाविकांनी आश्चर्य व्यक्त केले

 कार्यक्रमासाठी तालुक्यातील तसेच पंचक्रोशीतील नागरिक भाविक वारकरी मंडळ भजनी मंडळ यांच्यासह शाळकरी मुले तसेच मेव्हणा राजा नगरीतील नागरिक उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये