ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेमधील मूलभूत बदलाच्या केंद्रस्थानी – संध्याताई कोनपत्तीवार

सावली येथे शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे अंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूरच्या माध्यमातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंमलबजावणी करण्यासाठी शासकीय व खाजगी अनुदानित शाळेतील माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरातील शिक्षकांच्या शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाचे आयोजन पंचायत समिती सावली अंतर्गत विश्वशांती विद्यालयात करण्यात आले होते.

या प्रशिक्षणाच्या समारोपीय कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना गटशिक्षणाधिकारी संध्याताई कोनपत्तीवार यांनी नवीन शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कसे नाविन्यपूर्ण आहे तसेच शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेमधील मूलभूत बदलांच्या केंद्रस्थानी असल्याने पायाभूत स्तरापासून माध्यमिक स्तरापर्यंत प्रत्येक शिक्षकांचे सक्षमीकरण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन केले.

     पंचायत समिती सावली अंतर्गत नववी ते बारावी ला शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी नवीन शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने दोन टप्प्यात सदर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले त्यात तज्ञ मार्गदर्शक आणि सुलभक म्हणून प्रा.दिलीप अगडे डॉ.धर्मा गावंडे,प्रा.अशोक लांजेवार प्रा.पुरुषोत्तम कन्नाके यांनी सहभागी प्रशिक्षणार्थ्यांना अतिशय सोप्या पद्धतीने नवीन शैक्षणिक धोरणात समाविष्ट असलेल्या बाबी समजावून दिले.

पंचायत समिती सावली अंतर्गत आयोजित केलेल्या प्रशिक्षणाला तालुक्यातील नववी ते बारावीला शिकवणारे एकूण १६० शिक्षक प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात प्रशिक्षण संपन्न झाले. प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी प्रमोद भोयर,प्रिया गोडघाटे,मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार,रविंद्र कुडकावार विवेक बुर्लावार,परशुराम समर्थ, विलास लोखंडे,किरण खोब्रागडे, संदीप कामडी,चंद्रशेखर पीदुरकर,कमलाकर पाडेवार सुरेश डोईझड,संघपाल भगत,कल्पना गराटे,अजय कोंडेकर,पुरुषोत्तम निकुरे, नानाजी शेंडे, सुभाष गीरडकर यांचे सहकार्य लाभले.

या प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षकामधील असलेल्या क्षमतामध्ये नक्कीच वृद्धी होईल आणि या क्षमता वृद्धीचा चांगला परिणाम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या क्षमता वृद्धी मध्ये होईल.शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील क्षमता ओळखण्यासाठी आणि वाढविण्यासाठी हे प्रशिक्षण उपयोगी ठरेल.

                मधुकरजी वासनिक,  गट विकास अधिकारी,पंचायत समिती सावली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये