ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शहरात प्लॅस्टिक वापरावर बंदी ; सर्व दुकाने, संस्था, आस्थापणे, मार्केट यांना सूचना

तसेच नगर परिषद बल्लारपूर मार्फत सक्तीची पाणी कर वसूली मोहीम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

बल्लारपूर शहराच्या ह‌द्दीतील सर्व दुकाने, संस्था, आस्थापणे, मार्केट, संघटना कार्यालये व व्यक्तींना सूचित करण्यात येते की, केंद्रीय पर्यावरण वने व हवामान बदल मंत्रालयाने ऑगस्ट 2021 मध्ये अधिसूचित केलेल्या सुधारित प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन नियम 2021 नुसार तसेच 30 सप्टेंबर 2021 पासून 75 मायक्रॉन पेक्षा कमी आकाराच्या सर्व प्रकारच्या प्लॅस्टिक साहित्यावर बंदी घालण्यात आलेली आहे.

दिनांक 20/03/2024 रोजी बुधवार ला डेपो विभागामार्फत कार्यवाही करण्यात आली अंदाजे 30 आस्थापणे (हॉटेल, मार्केट, फिश / मटन/चिकन मार्केट) वर कार्यवाहित एकुण 15 किलो. एकल वापर (सिंगल युज) प्लॅस्टिक पकडण्यात आले असून रु. 8900 दंड आकारण्यात आला. सदर आस्थापना ना नोटिस बजावण्यात आली आले. सदर कार्यवाही नियमित सुरू राहणार असून याबाबत सर्व दुकाने, संस्था आस्थापणे, मार्केट संघटना कार्यालये व व्यक्तींनि नोंद घ्यावी.

संपूर्ण शहरात प्लॅस्टिक बंदी मोहीम प्रभावीपाने राबवायची असून सदर प्लॅस्टिक बंदी मोहिमेच्या यशस्वी वाटचाली करिता जप्ती पथक नेमण्यात आले आहे. सदर पथकामार्फत प्लॅस्टिक बंदी मोहिमेकरिता आस्थापणाची तपासणी स्थळ पंचनामा करणे, नोटिस बजावणे तथा दंडात्मक कार्यवाही करणे सुरु आहे.

दंडात्मक कार्यवाही करिता केंद्र शासनाचे प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन नियम 2016 व त्या खालील सुधारणा अन्वये जारी केलेल्या अधिसूचनेस अनुसरून प्लॅस्टिक बंदी, अविघटनशील वस्तूचे (उत्पादन, वापर विक्री वाहतूक हाताळणी साठवणूक अधिसूचना च्या अमलबजावणी बाबत व नियमांतर्गत कार्यवाही करणेसाठी महाराष्ट्र अविघटनशील कचरा नियंत्रण) कायदा 2006 च्या कलम 12 अन्वये.

पहिला गुन्हा रु. 5000 दंड प्रति घटना.

दूसरा गुन्हा रु. 10000 दंड प्रति घटना.

तिसरा गुन्हा रु. 25000 दंड व 3 महीने कारावास प्रति घटना.

वरील प्रमाणे कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री. विशाल वाघ यांनी दिली तसेच प्लॅस्टिक मुक्त शहर या मोहिमेस सर्व नागरिकानी नगर परिषद ला सहकार्य करण्यात असे आवाहन केले.

नगर परिषद बल्लारपूर मार्फत सक्तीची पाणी कर वसूली मोहीम

बल्लारपूर शहरातिल सार्वजनिक कूपन नलिका (टुबवेल) द्वारा नळाचे कनेक्शन असणाऱ्या सर्व नागरीकाना सूचित करण्यात येते की, नळ धारकाकडे पाणी प‌ट्टी देयक थकबाकी असेल तसेच चालू आर्थिक वर्ष 2023-24 देयक शिल्लक असलेले सर्व नळ धारकानी पाणी पट्टी देयक 31.03.2024 पर्यन्त नगर परिषददेच्या पाणी पुरवठा विभागात कार्यालयीन वेळेत भरण करण्यात यावी.

नगर परिषद बल्लारपूरमार्फत झोन निहाय जप्ती पथक नेमण्यात आले आहे सदर पथकामार्फत संपूर्ण शहरातून 19/03/2024 ला रु. 34780.00 20/03/2024 रु. 56020. 00 वसूली करण्यात आली. तसेच विविध पथकामार्फत आजपावेतो एकुण 20 नळ जोडणी कापण्यात करण्यात आली व जप्ती ची कार्यवाही करण्यात आली. संपूर्ण शहरात सक्तीने पाणी कर वसूली मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहीम अशीच अविरत चालू राहील 31 मार्च आधी सर्व नागरिकानी पाणी देयक अदा करावे.

सदर माहिती नगर परिषदेचे माननीय मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री विशाल वाघ यांनी दिली या मोहिमेस सर्व नागरिकानी नगर परिषद ला सहकार्य करावे असे आवाहन केले

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये