प्रा. अशोक डोईफोडे यांना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले पत्रकार भुषण पुरस्कार जाहीर
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
मराठी साहित्य मंडळच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले पत्रकार भूषण पुरस्कार जेष्ठ पत्रकार प्रा. अशोक भगवंतराव डोईफोडे यांना जाहीर झाला आहे, गेल्या 35 वर्षांपासून प्रा.अशोक डोईफोडे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत.
पत्रकारिता क्षेत्रातील योगदान लक्षात घेता या वर्षीचा मानाचा व अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार येत्या 31 मार्चला सरदार पटेल हायस्कूल,हिरडव ता लोणार जिल्हा बुलढाणा येथील सभागृहात आयोजित राज्यस्तरीय साहित्य संमेलनात मान्यवर अतिथीच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
असे राष्ट्रीय अध्यक्ष जेष्ठ साहित्यीक डॉ. जयप्रकाश घुमटकर(ठाणे)राष्ट्रीय उपाध्यक्ष जेष्ठ कवियत्री ललिता गवांदे,राष्ट्रीय सरचिटणीस जेष्ठ लेखिका नीलिमा जोशी यांनी कळविले आहे, प्रा अशोक डोईफोडे यांना राज्यस्तरीय पत्रकार भूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल देऊळगाव राजा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन तिडके,व इतर पदाधिकारी व सदस्य तसेच मित्र परिवार ने अभिनंदन केले आहे.