ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गरुड झेप मारत अव्वल यशाचे मानकरी ठरले स्वप्नील साबळे

सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेत मिळाले यश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

आपले वडील वसंतराव गोपाळराव साबळे उपविभागीय वन अधिकारी असल्याने त्यांच्या सारखेच अधिकारी होऊन देशसेवा, समाजसेवा करण्याचा दृढ संकल्प मनाशी ठेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी केली.

स्वप्नील यांनी पुना मराठवाडा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरची पदवी घेतली आहे.

इंजिनिअरिंग सोबतच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देत सन २०२० मध्ये फॉरेस्ट अधिकारी (RFO) ची परीक्षा पास झाले.

सन २०२१ मध्ये नायब तहसीलदार ची परीक्षा पास झाल्यामुळे नागपूर येथे प्रशिक्षण घेत असतांनाच तीन महिन्यांतच त्यांनी नायब तहसीलदार पद सोडून आपल्या वडीलासारखेच फॉरेस्ट अधिकारी व्हावे ही इच्छा ठेऊन त्यांची फॉरेस्ट अधिकारी पदासाठी नियुक्ती झाल्यामुळे ते डेहराडून येथे फॉरेस्ट अधिकारी प्रशिक्षण घेण्यासाठी रुजू झाले.

यावरच समाधान न बाळगता स्वप्नील याने महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा परीक्षा २०२२ मधील पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत या तिन्हीही टप्प्यात घवघवीत यश मिळवून त्यांची आज प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त आदिवासी विकास,वर्ग-१या पदावर निवड झाली आहे.

यामुळे सर्व स्तरावरून स्वप्नील साबळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.स्वप्नील साबळे हे लोकप्रश्न न्यूज चे संपादक प्रविणकुमार काकडे यांचे भाचे आहेत.

या नवीन नियुक्ती मुळे आदिवासी समाज बांधवांना एक नवं तरुण अधिकारी लाभल्यामुळे या समाजाचे असंख्य प्रश्न मार्गी लागून सतत त्यांच्या हातून अनमोल अशी समाजसेवा होत जाईल हीच या तरुण प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त स्वप्नील साबळे यांच्या कडून अपेक्षा.

गोर गरीब जनतेच्या सेवेसाठीच तसेच आदिवासी बांधवांच्या सेवेसाठीच मी सदैव तत्पर राहील.

स्वप्नील साबळे

प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त आदिवासी विकास वर्ग-१

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्वप्नील साबळे यांचा आदर्श घेऊन तयारी करावी.

 प्रविणकुमार काकडे

संपादक लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये