ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नागभीड पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे सार्वजनिक गणपतीचे विसर्जन

पोलीस चोख बंदोबस्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे

नागभीड तहसील अंतर्गत येणाऱ्या नागभीड पोलीस स्टेशन परिसरात शहरी व ग्रामीण ४९गणेश मंडळानी मूर्तीची स्थापना केली असून गणेश चतुर्दशी पासून १०दिवस भक्ती भावाने पूजन करून सर्व सार्वजनिक गणेश मंडळाना पोलीस विभागाचे सूचनेनुसार रात्री १०वाजेपर्यंत विसर्जन करणे गरजेचे आहे.

याकरिता नागभीड येथील ठाणेदार योगेश घारे यांचे मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त लावला असून सर्व कॅमेरे सुरु असून सर्व पोलीस कर्मचारी तैनात असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेत असल्याचे चित्र नागभीड नगर परिषद क्षेत्रात दिसून येत आहे. सर्व गणेश मूर्तिचे विसर्जन नवखडा येथील तलाव येथे करण्यात येत आहे.

याकरिता नगर परिषद प्रशासन आणि महसूल विभाग यांनी घटना स्थळाची पाहणी केली असून सर्व विसर्जन साठी सोपस्कार केले आहे. लाडक्या गणपतीला निरोप देत पुढच्या वर्षी लवकर या, असे गणेश भक्त भावाने निरोप देत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये