ताज्या घडामोडी

विवेकानंद विद्यालयात क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम

चांदा ब्लास्ट –

अतुल कोल्हे भद्रावती :
स्थानिक विवेकानंद विद्यालयात दिनांक 23 जानेवारी ते 25 जानेवारी या कालावधीत तीन दिवसीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी सदर स्पर्धांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला.
उद्घाटनिय कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय लांबट आणि प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक मोतीराम ताजने व सामाजिक कार्यकर्ते सूरज उमाटे ही मंडळी मंचावर उपस्थित होती.
सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन जि. प. प्राथमिक शाळा विंजासन च्या मुख्याध्यापिका अनिता पेंदाम आणि सेवानिवृत्त शिक्षिका सुनंदा झोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
कार्यक्रमाचे संचालन तुकाराम पोफळे व कल्पना ठावरी यांनी तर आभार प्रदर्शन दयाकर मग्गीडवार व आशा मते यांनी केले.
या तीन दिवसीय सत्रात कबड्डी, लंगडी आदी सांघिक खेळ, 100 मी., 200 मी. दौड, स्लो सायकलिंग आदी मैदानी खेळ तसेच, तीन पायांची दौड, चमचा गोळी, संगीत खुर्ची आदी वैयक्तीक खेळ खेळवण्यात आले. सर्वच खेळ व स्पर्धांत विद्यार्थ्यांनी मोठ्या हिरीरीने व मोठ्या संख्येने भाग घेतला.
दुसऱ्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्यात समूह नृत्य, एकल नृत्य, नाटिका, नकला इत्यादी विविध गुणांचे कलादर्शन विद्यार्थ्यांनी घडवले.
शेवटच्या दिवशी स्नेहभोजन द्वारे कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
सर्व खेळ व स्पर्धांचे बक्षीस वितरण गणराज्य दिनाच्या कार्यक्रमात करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दयाकर मग्गीडवार, कल्पना ठावरी, आशा मते, तुकाराम पोफळे, पुरुषोत्तम श्रीरामे आदी शिक्षकांनी तसेच विनोद गावंडे, रामदास ठक, विश्वनाथ हरबडे, बंडू कांबळे आदी शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये