ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रत्येक बँक व पतसंस्थाने सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घ्यावी – पोलीस निरीक्षक संतोष महल्ले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 पोलीस स्टेशन देऊळगाव राजा येथे पो. स्टे. हद्दीतील राष्ट्रीयकृत बँका तसेच पतसंस्था व्यवस्थापक यांची बँक सुरक्षेच्या दृष्टीने मिटिंग घेण्यात आली. मिटिंगमध्ये अलीकडील काळात बऱ्याच ठिकाणी ए.टी.एम.फोडून चोरीचे प्रकार/प्रयत्न झालेले आहे.

तसेच रात्रीच्या वेळी बँक फोडून कॅश व लॉकर मधील मौल्यवान वस्तू दाग दागिने यांची चोरी करण्याचा प्रयत्न काही शहरात झालेला आहे. तरी असे प्रकार भविष्यात होऊ नये याकरिता सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना म्हणून उपस्थितांना पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांनी मार्गदर्शन करून प्रत्येक बँकेला सुरक्षा रक्षक नेमून, सीसीटीव्ही, कॅमेरे, सायरन कार्यान्वित ठेवणे बाबतची खबरदारी घेणे संबंधाने सुचना दिल्या. सदर मिटिंग करीता राष्ट्रीयकृत बँकेचे व पतसंस्थेचे 18 व्यवस्थापक हजर होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये