ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ज्ञानगंगा नित्यानंद आश्रमात नवरात्र उत्सव साजरा 

विविध कार्यक्रमाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

ज्ञानगंगा नित्यानंद आश्रम सेवा संस्था व गोसेवा केंद्र नंदप्पा /च्या वतीने कोलांडी येथे दिनांक 22 ऑक्टोबर 2023 रोजी नवरात्र अष्टमी पर्वाच्या निमित्ताने मंत्र दीक्षा सामूहिक ध्यान, महासत्संग सोहळा, होम हवन, नव कन्या पूजन,लहान मुलांना शालेय साहित्य व गोर गरीबाना वस्त्रदान आर्थिक सहाय्य आणि सत्कार समारंभ सारखे विविध कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले.

सत्कारमूर्ती प्राचार्या सौ. स्मिता अनिल चिताडे महात्मा गांधी विद्यालय,कनिष्ठ महाविद्यालय,गडचांदूर यांना नुकताच शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिशिका पुरस्कार शिक्षण मंत्रांच्या हस्ते प्रदान करण्यात आला या अनुषंगाने स्मिता अनिल चिताडे मॅडम यांचा ज्ञानगंगा नित्यानंद आश्रम सेवा संस्था कोलांडी नंदप्पा यांच्या तर्फे सत्कार करण्यात आला त्यांनी आपल्या मार्ग दर्शन व मनोगतात दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या व्यवस्थेसाठी योग्य संधी मिळण्यासाठी या संस्थेच्या माध्यमातून सदैव कार्य करण्याची ग्वाही दिली सोबतच संस्थेला सदैव मदत करण्याचे आश्वासन दिले आणि आश्रमाच्या विकास होण्यासाठी त्यांनी पुरस्कारां मधून प्राप्त झालेली एक लाखाची आर्थिक देणगी आश्रमाला भेट दिली श्री दिलीप झाडे (संचालक स्कालर सर्च अकॅडमी कोरपना)यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेचे कार्य म्हणून भविष्यात या संस्थेला तरुण पिढीसाठी रोजगाराचे आणि अध्यात्मिक केंद्र बनवण्यासाठी जे कार्य सुरू आहे त्या कार्याला पूर्ण करण्यासाठी मी संस्थेसोबत आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

डॉक्टर किसनराव भोयर (होमिओपॅथिक तज्ञ)यांचा सत्कार करण्यात आला त्यांच्या हस्ते लहान मुलांची औषधी वितरण करण्यात आली त्यांनी गोर गरीब लोकांसाठी आश्रमात अनेक निशुल्क होमिओपॅथिक शिबिर घेऊन वैद्यकीय सेवा करत आहे आपल्या मनोगतात मी संस्थेतर्फे पुन्हा अनेक शिबिर घेऊन आरोग्य सेवा अनेक गरजूंना प्राप्त होईल असा प्रयत्न माझा सदैव राहील अशी भावना व्यक्त केली.

श्री बंडूभाऊ गेडाम समाज सेवक कोरपना यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आश्रमाच्या सेवेसाठी सदैव प्रयत्नशील राहून त्यांचा लाभ समाजाला कसा प्राप्त होईल यावर त्यांनी संस्थेसोबत राहून कार्य करण्याचे आश्वासन दिले, या उत्सव सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून श्री अरुण भाऊ निमजे,श्री श्याम बाबू पुगलिया,श्री सुशील कुमार सरकार (पी एस आय पिट्टी गुडा,) श्री,घोडके साहेब (पी एस आय पाटण ),श्री रमेश भालेराव,श्री मुंडेवार,श्री गजानन शिंगरू,श्री श्यामराव खुजे,श्री प्रशांत भाऊ गोखरे,श्री पहाणपटे सर,सौ मत्ते मॅडम सौ.नीता उपलेंचवार, श्रध्दा झुल्लूरवार,श्री सुरेश केंद्रे आणि शक्तिपात गुरू मार्गातील सर्व साधक साधिका आणि परिसरातील भक्त मंडळी आणि बालगोपाल असे 600 ते 700भक्तांची उपस्थिती कार्यक्रमाला लाभली.

नव कन्याचे पूजन व वस्त्रदान,लहान मुलांना मुलींना शालेय साहित्य श्री प्रशांत भाऊ गोखरे यांच्या परिवार तर्फे श्री जामवंत राठोड नाईक नगर या अपंग व्यक्ती ला पायांच्या ऑपरेशन करण्यासाठी काहीं आर्थिक मदत करण्यात आली तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री शंकररावजी देवाळकर यांनी संस्थेमध्ये सामाजिक आणि अध्यात्मिक दृष्टिकोनावर विचार मांडून भविष्यातील संस्थेच्या सेवेविषयी माहिती दिली या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी ज्ञानगंगा नित्यानंद आश्रमाच्या सर्व महिला पुरुष कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये