ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर :- केंद्र सरकारकडून सतत वाढविण्यात येत असलेल्या पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दरवाढीच्या निषेधार्थ कोरपना तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने कोरपना बसस्थानक येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदार पल्लवी आखरे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तालुका काँग्रेस अध्यक्ष उत्तम पेचे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. वाढत्या इंधन दरामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी व कामगार वर्ग आर्थिक संकटात सापडला असून केंद्र सरकारने तातडीने दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

           आंदोलनात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक बावणे, गडचांदूर नगरपरिषदचे उपाध्यक्ष संजय मेंढी, पंचायत समितीचे माजी सभापती श्याम रणदिवे, सचिन भोयर, भाऊजी चव्हाण, सुरेश मालेकर, गणेश गोडे, शैलेश लोखंडे, नगरपरिषद सभापती तुषार बावणे, न. प. गटनेत्या प्रणिता उपाध्ये, नगरसेविका मनिषा परचाके, रोशन आस्वले, मिलिंद ताकसांडे, आशिष मोहुर्ले, वहाब भाई, रसूल पटेल, अनिल गोंडे, सरपंच रोशन मरापे, सुधाकर नांदेकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये