ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निमणी येथे बाल सुसंस्कार शिबिरात आरोग्य तपासणी

अर्थ फाउंडेशनचा उपक्रम ; 28 विद्यार्थ्यांची केली तपासणी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

कोरपना तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या निमणी येथे अर्थ फाउंडेशन गडचांदुरच्या वतीने वैद्यकीय अधिकारी डॉ कुलभूषण मोरे यांनी श्री गुरुदेव बाल सुसंस्कार शिबिरात 28 विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

     मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलांमध्ये चांगले संस्कार रुजवण्यासाठी आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध गावांमधे आणि शहरांमध्ये हे शिबिर सुरू करणे गरजेचे आहे

      अशा बाल सुसंस्कार शिबिरांमध्ये मुलांच्या मानसिक आणि बौद्धिक विकासासोबतच त्यांच्या शारीरिक आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मतही डॉ कुलभूषण मोरे यांनी व्यक्त केले.

         यावेळी संजय गांधी निराधार समिती माजी अध्यक्ष उमेश राजुरकर माजी तमूस अध्यक्ष संजय राळे संतोष गारघाटे दत्तू सुर्तेकर साहिल धोटे साहिल टोंगे जनार्धन सावरकर लक्ष्मण टोंगे गणेश सुर्तेकर आनंदराव पाटील आदी उपस्थित होते.

        या शिबिरात मुलांची शारीरिक ताकद वाढवण्यासाठी योग, प्राणायाम, मैदानी खेळ आणि विशेष करून मलखांब लाठी काठी सारख्या खेळांचे प्रशिक्षण दिले जाते.

        दैनंदिन जीवनात पाळायच्या चांगल्या सवयी म्हणून आई-वडील व मोठ्यांचा आदर करणे आणि आपल्या संस्कृतीची ओळख करून दिली जाते.

         शिबिरामध्ये देशभक्तीपर गीते, प्रार्थना, भजन, वक्तृत्व आणि सामूहिक शिस्तीचे धडे दिले जातात.ध्यान आणि वेगवेगळ्या बौद्धिक खेळांच्या माध्यमातून मुलांची स्मरणशक्ती व एकाग्रता वाढवण्यावर भर दिला जात आहे

        जिल्ह्यातून मोझरी येथे शिक्षण घेणाऱ्या प्रथमेश पाटील स्वागत गारघाटे ध्रुप वाघमारे संघर्ष कोटरंगे या विद्यार्थ्यांनी निमणी येथे श्री गुरुदेव बाल सुसंस्कार शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये