ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गडचांदूर नगराध्यक्षांचा कायद्याला ठेंगा : 1/4 नगरसेवकांनी मागणी करूनही विशेष सभा नाही

प्रभारी CO येमाजी धुमाळ यांच्यावरील निविदा व निधी अपहार प्रकरण दाबण्याचा प्रयत्न" - नगरसेवकांचा आरोप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

*ll कलम 79(2) चा भंग: जिल्हाधिकाऱ्यांनी सभा बोलवावी – 9 नगरसेवकांची मागणी ll*

*गडचांदूर:* प्रभारी मुख्याधिकारी येमाजी धुमाळ यांच्यावर बोगस निविदा व निधी अपहार केल्याप्रकरणी चौकशी करून FIR नोंदविण्यासाठी विशेष सभा घेण्याची लेखी मागणी करूनही नगराध्यक्षांनी 15 दिवसांत सभा न बोलावल्याने, गडचांदूर न.प.च्या 1/4 पेक्षा जास्त नगरसेवकांनी आज जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्याकडे धाव घेतली आहे.

*नेमकं प्रकरण काय?*

दि. 30/05/2026 रोजी न.प.च्या 9 नगरसेवकांनी नगराध्यक्षांना लेखी पत्र देऊन, *”तत्कालीन प्रभारी मुख्याधिकारी येमाजी धुमाळ यांचेवर बोगस निविदा व निधीचा अपहार केल्याप्रकरणाची चौकशी करून पोलीस स्टेशन गडचांदूर येथे FIR नोंद करण्याबाबत”* विशेष सभा तातडीने बोलावण्याची मागणी केली होती.

*कायदा काय सांगतो?*

महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम 1965 चे कलम 79(2) नुसार, *एकूण सदस्य संख्येच्या एक चतुर्थांश सदस्यांनी लेखी मागणी केल्यास, नगराध्यक्षांनी मागणी अर्ज मिळाल्यापासून 15 दिवसांच्या आत विशेष सभा बोलावणे बंधनकारक आहे.*

*नगराध्यक्षांनी काय केले?*

“दि. 30/05/2026 रोजी मागणी करून आज 18 दिवस पूर्ण झाले आहेत. परंतु नगराध्यक्ष यांनी *जाणीवपूर्वक, मुख्याधिकारी येमाजी धुमाळ यांना पाठीशी घालण्यासाठी, अद्यापपर्यंत सभा बोलावलेली नाही. हा कायद्याचा स्पष्ट भंग व कर्तव्यात घोर कसूर आहे,”* असा थेट आरोप नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.

*आता पुढे काय?*

कलम 79(2) मधील तरतुदीनुसार, नगराध्यक्षांनी विहित मुदतीत सभा न बोलावल्यास, *जिल्हाधिकारी यांना स्वतःच्या अधिकारात अशी विशेष सभा बोलावण्याचे पूर्ण अधिकार आहेत.* याच आधारावर नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने विशेष सभा बोलावण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे.

आता जिल्हाधिकारी काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये