ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सफारी बुकिंग मधील अनागोंदी कारभाराची पुर्नचौकशी व्हावी
खासदार प्रतिभा धानोरकर यांची वनमंत्र्याकडे तक्रार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प वाघांच्या अधिवासामुळे जागतिक स्तरावर कीर्तीमान आहे. निसर्ग व विशेषतः वाघ तसेच अनेक प्रजातीच्या वन्यजीवांच्या दर्शनामुळे देश विदेशातील पर्यटकांना या व्याघ्र प्रकल्पाने भुरळ घातली आहे.
वनविभागाने अधिकृत वेब साईट जारी करून ऑनलाइन पद्धतीने प्रवेश व जंगल सफारी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाते.
मात्र ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पर्यटन व्यवस्थापक गोविंदा असोप यांनी स्थानिक रिसॉर्ट व्यवस्थापक, होमेस्ट मालक यांना हाताशी धरून सफारी बुकिंग मध्ये कथित गैरव्यवहार, ट्रॅव्हल्स एजंट करून लाच घेणे, अरेरावीची भाषा आदी गंभीर प्रकार केल्याचा आरोप करण्यात आला होता. सदर गैरव्यवहाराची थातूरमातूर चौकशी होऊन त्यांना ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प (TATR) चंद्रपूर यांचे पत्र क्र.कक्ष – ल. ले./२०२५- २०२६ /९४३ दि.०७.जानेवारी २०२५ फाइल TMG – २०२६ ०५१८ – WP ००१९ jpg अन्वये क्लीन चीट देण्यात आली होती.
सदर कार्यवाही संशयास्पद असून डिजिटल पुरावे ग्राह्य असताना सुद्धा हेतुपुरस्पर क्लीन चिट देण्यात आल्याने सबंधित चौकशी अधिकाऱ्यांची च चौकशी करण्यात येऊन दोषी वर कडक कारवाई करण्यात यावी. अशी मागणी कामगार सेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुयोग भोयर यांनी करून सबंधित सावळा गोंधळ खासदारांच्या निदर्शनात आणून दिला.
चंद्रपूर वणी – आर्णी क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी कथित गैरव्यवहार व पक्षपाती क्लीन चिट अहवालाचे गांभीर्य ओळखुन महा. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना दि.२७ मे २०२६ रोजी एका निवेदनाद्वारे अवगत करून सर्व डिजिटल पुरावे व तक्रारी ग्राह्य मानून पुर्नचौकशीकरण्यात यावी अशी मागणी केली आहे.



