ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपण्यात आशा व गट प्रवर्तक संघटनेचा तालुका मेळावा संपन्न

गट विकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे कोरोना काळातील ग्रामपंचायत स्तरावरून थकीत दरमहा हजार रु.देण्याची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

अन्यथा 26 जुलै रोजी जिल्हा परिषद कार्यालय समोर छत्री मोर्चा काढण्याचा आयटकचा इशारा.

कोरपना :- कोविड -19 संदर्भात कोरो नाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता प्रशासना मार्फत आशा वर्कर व गट प्रवर्तक यांना कोविड-19 च्या अनुसंगाणे विशिष्ट जबाबदारी निश्चित करून देण्यात आली होती.जिल्हा स्तरावरून दिलेल्या आदेशानुसार त्यांचे कार्यक्षेत्रात आशा व गट प्रवर्तक हे आपली कर्तव्य ग्राम पंचायत स्तरावर ,गाव स्तरावर पार पाडलेली आहेत.अहोरात्र मेहनत घेऊन जीवाची पर्वा न करता कोविड शी निगडित ईतर कामे केलेली आहेत. आशा व गट प्रवर्तक यांना मिळणाऱ्या मानधन व्यतिरिक्त दरमहा रु.हजार इतकी प्रोत्साहन पर रक्कम अदा करणे बाबत दि.31 मार्च 2020 व 4 जून 2020 अन्वये शासन स्तरावरून कळविण्यात आले होते.त्यानुसार गाव स्तरावर काम करणाऱ्या आशा व गट प्रवर्तक यांना प्रोत्साहन पर भत्ता म्हणून कोरोना काळातील दरमहा रु हजार अदा करण्यात यावे असे मा.मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी दि.28 सप्टेंबर 2022 व 21 जून 2023 नुसार आपल्या अधिनिस्त असलेल्या सर्व ग्राम पंचायतिला आदेशित केले होते.
परंतु आता पर्यंत या आदेशाची कुठेही अमलबजावणी झाली नाही तसेच आयुष्मान भारत योजने अंतर्गत सुध्या केलेल्या सर्वेचे प्रती कुटुंब 10 रू.नुसार मोबदला ग्राम पंचायत स्तरावरून देण्यात आले नाही तसेच इंद्र धनुष्य मिशन सर्व्हेचे योग्य मोबदला न देता त्यांच्यावर काम करण्यास दबाव आणला जात आहे त्यामुळे संतप्त झालेल्या आशा वर्कर व गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांनी कॉ.विनोद झोडगे राज्य सचिव आयटक यांच्या मार्गदर्शनात स्थानिक पंचायत समिती सभागृहात तालुका स्तरीय मेळावा आयोजित केला व आपल्या अनेक समस्यांचा पाढा वाचला यानंतर मा. पेंदाम साहेब गट विकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांना निवेदन देऊन तातडीने कोरोना काळातील ग्रामपंचायत स्तरावरून देण्यात येणारे थकीत दरमहा रु हजार व आयुष्मान भारत योजने अंतर्गत सर्व्हेचे, आभा कार्डचे पैसे देण्यासंबंधी ग्राम पंचायतिला आदेशित करावे.अन्यथा आयटक च्या नेतृत्वात 26 जुलै 2023 रोजी चंद्रपूर जिल्हा परिषद कार्यालय समोर छत्री मोर्चा काढण्याचा इशारा कॉ.विनोद झोडगे,सविता जेनेकर,सखू खोके, शोभा कुळमेते, ज्योत्स्ना पंधरे,वंदना निरंजने,नेहा जगताप यांनी दिला.
मेळाव्याचे संचालन नेहा जगताप तर आभार ज्योत्स्ना पंधरे नी मानले यावेळी तालुक्यातील शेकडो आशा वर्कर व गट प्रवर्तक कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये