जिल्हा स्मार्ट ग्रामपंचायत बिबी येथे ६६ लक्ष रुपयांच्या विकासकामांचे आ. सुभाष धोटेंच्या हस्ते भूमिपूजन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
जिल्हा स्मार्ट ग्रामपंचायत, बिबी येथे ६६ लक्ष रुपयांच्या विकासकामांचे आ. सुभाष धोटेंच्या हस्ते भूमिपूजन पार पडले. यात सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकाम करणे – १५ लक्ष, स्मशानभूमीला वॉल कंपाऊंड बांधकाम करणे – १० लक्ष, घनकचरा प्रकल्प तयार करणे – १३ लक्ष, सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकाम करणे – ५ लक्ष, बंद सिमेंट पाईप नाली बांधकाम करणे – ५ लक्ष, बंद सिमेंट पाईप नाली बांधकाम करणे – ७ लक्ष, रामनगर येथे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करणे – ८ लक्ष, प्रवेशद्वाराजवळ पेवर ब्लॉक लावणे – ३ लक्ष, ग्रामपंचायत भवन परिसरात पेवर ब्लॉक लावणे – २.३० लक्ष रुपये निधीच्या विकासकामांचे भुमिपुजन करण्यात आले.
या प्रसंगी बिबीच्या सरपंच माधुरी टेकाम, उपसरपंच प्रा. आशिष देरकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक बावणे, पंचायत समितीचे माजी सभापती साईनाथ कुळमेथे, ग्रा.पं. सदस्या प्रणाली कोरांगे, सोनाली आत्राम, ग्रामविकास अधिकारी धनराज डुकरे, पोलिस पाटील राहुल आसुटकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष स्वप्नील झुरमुरे, बापुजी पिंपळकर, आनंद पावडे, शामकांत पिंपळकर यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.