ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांनी स्पर्धापरीक्षेत स्वतःला सिद्ध करावे

माजी मंत्री खान अजहर हुसेन यांचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

सध्याच्या वैज्ञानिक युगात स्पर्धा परीक्षेला महत्व असून अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांनी स्वतः मधील न्यूनगंड विसरून स्पर्धा परीक्षेत स्वतःला सिद्ध करावे असे आवाहन स्थानिक आमेना अजीज उर्दू हायस्कूल येथे बरार तालीमी कारवा तर्फे आयोजित स्पर्धा परीक्षा बक्षीस वितरण कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शन प्रसंगी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रख्यात उर्दू कवी गणी गाझी होते.

 अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची गोडी लागावी, त्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये स्वतःला सिद्ध करता यावे या उद्देशाने बरार तालीमी कारवा तर्फे उर्दू भाषिक विद्यार्थ्यांसाठी बुलढाणा, वाशिम अकोला वर्धा ह्या जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा घेण्यात आल्या.या परीक्षेत बुलढाणा जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सदर परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना रोख बक्षीस व प्रशस्तीपत्र वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लाखनवाडा येथील प्रसिद्ध उर्दू कवी गणी गाझी हे होते. व्यासपीठावर माजी मंत्री तथा संघटनेचे अध्यक्ष खान अझहर हुसेन, संघटनेचे सचिव सरफराज खान, संघटनेचे सदस्य हाजी आलमखान कोटकर, जाकीर हुसेन उर्दू हायस्कूल दे.मही चे अध्यक्ष हाजी बी एम पठाण,माजी उपनगराध्यक्ष इकबाल कोटकर,संस्थेचे उपाध्यक्ष हाजी ईनायत कोटकर,संचालक मुशीरखान कोटकर,अल्ताफ कोटकर, माजी नगरसेवक इस्माईल बागवान,सेवानिवृत मुख्याध्यापक अब्दुल हमीद,अब्दुल अजिमोद्दीन,मुख्याध्यापक अब्दुल हाई शेख, राष्ट्रवादी कार्याध्यक्ष शेख कदीर,युवा नेते रफिक भाई आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी पुढे बोलताना खान अझर हुसेन यांनी आमेना अजीज उर्दू हायस्कूल अँड सायन्स जुनियर कॉलेजच्या शैक्षणिक प्रगती विषयी गौरवोदगार काढले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष गणी गाजी यांनी उर्दू भाषा व सद्यस्थितीत अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्थितीत होणारी सुधारणा याबाबत समाधान व्यक्त करताना अल्पसंख्यांक समाजातील पालकांनी आपल्या पाल्यांच्या शिक्षणाविषयी जागरूत राहण्याचे आवाहन केले. याप्रसंगी अब्दुल हमीद व डॉ.कोटकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.तर जिल्हाभरातून आलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्राचार्य शारीरिक नायब यांनी तर अल्ताफ कोटकर यांनी आभार व्यक्त केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये