ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आधार वेल महिला बहुउद्देशीय संस्था गडचांदूरच्या वतीने मोफत आरोग्य शिबीर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आधारवेल महिला बहुउद्देशीय संस्था गडचांदूर तर्फे बोरकर नगर गडचांदूर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर भूषण मोरे होते.

तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्षा सौ. सविता ताई टेकाम प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर नंदिनी मोरे तर विशेष अतिथी म्हणून कल्पनाताई निमजे सभापती महिला व बालकल्याण समिती, नलिनीताई खेकडे तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. या शिबिरात मधुमेह बीपी, शुगर, त्वचारोग आणि महिलांना होणाऱ्या विविध आजारावर तपासणी व उपचार करून औषधी देण्यात आली.

या शिबिराचा एकूण 70 महिला रुणांनी लाभ घेतला. त्यांची तपासणी डॉक्टर नंदिनी मोरे व डॉक्टर कुलभूषण मोरे यांनी केली. रुग्णांना मोफत औषध डॉक्टर खेकडे व डॉक्टर मोरे यांच्या सौजन्याने उपलब्ध करून देण्यात आले. महिला दिनाचे औचित्य साधून  सविताताई टेकाम नगराध्यक्षा नगरपरिषद गडचांदूर,डॉक्टर नंदिनी मोरे आणि अर्चनाताई मुत्तेलवार यांचा शाल व श्रीफळ देऊन संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता आधार वेल संस्थेच्या संचालिका उषाताई टोंगे, यांनी विशेष परिश्रम घेतले.वंदना कातकडे अर्चना देवलवार,सौ.कल्पना गोवारदिपे,अनिता पाहनपटे, नंदा कोंगरे, नंदा वांढरे, वंदना धांडे,विजया कुचनकर, सविता चटप, अनिता बामनकर,तसेच बोरकर वार्डातील महिला भगिनींनी मोलाचे सहकार्य केले.

 कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन अर्चना काळे यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये