ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आळंद येथे 3 बैल चोरून नेले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे 

तालुक्यातील आळंद येथील शेतकरी विष्णू कडूबा खार्डे(46) यांच्या घरासमोर बांधलेले 3 बैल अज्ञात चोरांनी चोरून नेल्याची घटना 10 मार्च ला उघडकीस आली आहे, श्री खार्डे याचे 1 लाख 20 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी खार्डे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद साळवे करीत आहेत.

पशुधन चोरी च्या घटना मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याचे लोण देऊळगाव राजा तालुक्यात पसरले आहे. पोलिसांनी कसून तपास करून पशुधन चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये