ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोंडपिंपरी येथे २३ जुलैला विदर्भ राज्य आंदोलन समितीची बैठक

चांदा ब्लास्ट
दिनांक ९ ऑगस्ट ला क्रांतीदिनी नागपूर येथे होणार्‍या ” लॉंग मार्च व ऊर्जामंत्री निवास घेराव ” आंदोलनाच्या पूर्वतयारी साठी दिनांक २३ जुलै २०२३, रोज रविवारला दुपारी बारा वाजता गोंडपिंपरी येथील धनोजे कुणबी सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला विदर्भ राज्य आंदोलन समिती कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीच्या गोंडपिपरी शाखेने केले आहे.
               या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. वामनराव चटप राहणार आहेत. स्वतंत्र विदर्भ राज्य, वाढते वीजबिल, विदर्भात येणारे दोन नवीन औष्णिक वीज प्रकल्प विदर्भाबाहेर न्यावे, शेतमालावरील १८ टक्के जीएसटी रद्द करावी, बासमती व्यतिरिक्त अन्य तांदूळ निर्यात करण्याची बंदी तातडीने उठवावी, या प्रमुख मागण्यांसाठी ९ ऑगस्ट क्रांतीदिनी नागपूर येथे लॉंग मार्च व ऊर्जामंत्री निवास घेराव आंदोलन होणार आहे. यादृष्टीने संपूर्ण विदर्भात आढावा घेतला जात आहे. या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी होणार्‍या या बैठकीत सहभागी होण्याचे आवाहन समितीने केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये