ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुलाच्या निर्मितीसाठी प्रलंबित जागेच्या मागणी संदर्भात बोरगाव वासियांतर्फे रास्ता रोको आंदोलन

वहिवाटीचा जुना रस्ता गेला कुठे? बोरगाव वासियांचा प्रशासनाला सवाल!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार

उदापूर ते बोरगाव सावलगाव या रस्त्यावर नुकतेच प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून डांबरीकरण पूर्ण झाले असून इथूनच भुती नाल्यावर पुलाचे काम मंजूर आहे. मात्र या पुलासाठी लागणारी जागा अगोदर पासून उपलब्ध होती. मात्र ती जागा आता कुठे गेली म्हणून रोष व्यक्त करीत उपलब्ध नसलेल्या जागेसाठी बोरगाव येथील गावकऱ्यांनी जागेच्या मागणी संदर्भात रोष व्यक्त करीत बुधवार दिनांक ६ मार्च २०२४ सकाळी १० वाजता पासून रास्ता रोको आंदोलन पुकारला आहे.

 रामदेव बाबा सल्वंट कंपनी जवळ नवीन ईथेनाल प्लॅन्ट निर्मिती होत आहे. त्याजवळुन भुतिनाल्यातून फार पूर्वीपासून जुना बोरगावला येणे-जाण्यासाठी रस्ता होता. बरेच वर्ष त्या रस्त्याने गावकऱ्यांची वहिवाट सुरू होती. मात्र भूती नाल्याला पाणी राहत असल्यामुळे नागरिक तात्पुरत्या स्वरूपाने एका शेतकऱ्याच्या खाजगी जागेतून नाल्यावर पाणी अडवण्यासाठी बांधण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यावरून ये जा करीत होते. त्यामुळे जुन्या वहिवाटीच्या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले .मात्र त्या शेतकऱ्यांनी खाजगी जागेतून बोरगाव वासियांचा ये जा करण्याचा रस्ता बंद केल्यामुळे त्यांच्या जुन्या वहिवाटीचा रस्ता सध्या परिस्थितीत अस्तित्वात दिसत नाही. व त्या ठिकाणी पुल मंजूर झाला आहे. मात्र पुल बांधण्यासाठी आता जागेची गरज आहे. ती अगोदर होती मात्र आता ती गायब झाल्याचा प्रकार सध्या परिस्थितीत दिसतोय. पुलाला जागा मिळावी म्हणून नागरिकांनी उदापूर पासून रामदेव बाबा साल्वंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कडे जाण्याच्या रस्त्यावर बोरगाव येथील नागरिकांनी बुधवार दिनांक ६ मार्च रोजी सकाळी १० वाजता पासून रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. प्रलंबित मागणी जोपर्यंत सुटणार नाही तोपर्यंत रास्ता रोको आंदोलन सुरूच राहणार असल्याचे बोरगाव येथील नागरिकांचे म्हणणे आहे . त्यामुळे सदर रस्त्यावर असलेल्या रामदेव बाबा साल्वंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत जाणारे बरेच माल वाहतुकीचे ट्रक बराच वेळ रस्त्यावरच उभे होते. सदर कंपनीला या रस्ता आंदोलनामुळे भुर्दंड सहन करावा लागत आहे. जोपर्यंत स्थानिक प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी आंदोलन स्थळी येऊन रास्त मागणी संदर्भात पाठपुरावा करणार नाहीत तोपर्यंत रास्ता रोको आंदोलन पुन्हा तीव्र होण्याची शक्यता लोकांच्या आक्रोशावरून दिसून येत आहे.

मात्र कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्तासह आंदोलन स्थळी हजर आहेत.

बोरगाव येथील नागरिकांनी जागा रीतसर मोजणी संदर्भात तहसील विभागाकडे अर्ज केला त्यानुसार नायब तहसीलदार गोविंदवार मंडळ अधिकारी यांनी “क” प्रतनुसार इथेनाल कंपनीच्या जागेची मोजणी करण्यात आली. त्यातील जागा ही कंपनी मालकाच्या नावे आढळून आली. त्यानंतर भुती नाल्याच्या बाजूने सरकारी जागेचे मोजमाप करण्यात आले मात्र त्यातही रस्त्याची जागा न निघाल्यामुळे बोरगाव येथील नागरिकांनी बोरगाव भुती नाल्यातुन जाणाऱ्या रस्त्याच्या जागेसंदर्भातील प्रलंबित मागणी संदर्भात बोरगाव येथील शेकडो नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन केले.

 प्रतिक्रिया

उदापूर बोरगाव ते सावलगाव रोडवरील भुती नाल्यावरील पुलिया आणि रस्ता पुलीयाच्या डिझाईन नुसार जेवढी नियोजित जागा लागते. तसेच रस्त्याच्या जागे संदर्भात माझ्या कडील ताब्यात असणारी ही जागा मी गावकऱ्यांच्या हितासाठी मोकळी करून देण्यास तयार आहे. आणि तात्पुरत्या स्वरूपात नाल्यातून बोरगाव येथील नागरिकांना येण्यास जाण्यासाठी तात्पुरता रस्ता बनवण्याकरिता माजी सहमती आहे. बुधवार दिनांक ६ मार्च २०२४ रोजी गावकऱ्या समक्ष मी स्टॅम्प पेपरवर लेखी लिहून देत आहे.

दुर्गादास मोहता

      संचालक

इथेनॉल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी उदापूर (बोरगाव)

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये