ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूर – गडचिरोली येथील ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन व्हावे – प्राचार्य डॉ. डी.एच. गहाणे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार

         ऐतिहासिक स्थळांना गौरवशाली इतिहास लाभला आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात असे अनेक ऐतिहासिक पर्यटन स्थळे असून त्याचे संवर्धन होणे काळाची गरज आहे. या स्थानिक इतिहासावर विद्यार्थ्यांनी संशोधन करावे आणि संशोधन मार्गदर्शक म्हणून समोर यावे असे आवाहन प्राचार्य डॉ. डी. एच. गहाणे यांनी केले. ते नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात इतिहास विभाग आयोजित “चंद्रपूर -गडचिरोली जिल्ह्यातील ऐतिहासिक पर्यटन स्थळाचा अभ्यास” या सर्टिफिकेट कोर्सच्या समारोपीय कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून बोलत होते.

    यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. डी. एस. एम. शेकोकार, मराठी विभागप्रमुख कवी डॉ. धनराज खानोरकर, इतिहास विभागप्रमुख डॉ. मोहन कापगते उपस्थित होते. यावेळी अतिथिंनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आणि कोर्सवर्कचे महत्त्व सांगितले. पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. या कोर्समध्ये पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री शेंडे हिने केले. तर प्रास्ताविक डॉ. मोहन कापगते यांनी तर आभार समृद्धी बनपूरकर यांनी मानले. सुहानी गजपुरे हिने मनोगत व्यक्त केले.

   कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. करुणा जनबंधू, प्रा. अमोल बोरकर, प्रा. हर्षा बगमारे, प्रा. मंगेश जराते आणि विद्यार्थ्यांनी योगदान दिले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये