ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विहिरीत पडलेल्या नागाला सर्पमित्राने दिले जीवनदान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार

       ब्रम्हपुरी तालुक्यातील खरकाडा (पिंपळगाव) शेत शिवारात सुरू असलेल्या नविन विहिरीच्या बांधकामाच्या खड्ड्यात पडलेल्या नाग सापाला सर्पमित्राने पकडून सुरक्षित ठिकाणी सोडून  जीवनदान दिले.

निलज येथील गुरुदेव सोंदरकर यांच्या नवीन विहिरीचे बांधकाम सुरू आहे .या विहिरीच्या बांधकामाच्या पंधरा ते वीस फूट खोल खड्ड्यामध्ये दोन दिवसापूर्वी रात्रीच्या सुमारास नाग साप पडला असल्याचे गुरुदेव सोंदरकर यांना शेतावर गेले असता दिसून आले. याबाबतची माहिती सोंदरकर यांनी पत्रकार विनोद चौधरी यांना दिली असता ब्रम्हपुरी येथील अर्थ कंजर्वेशन ऑर्गनायझेशन संस्थेचे सर्पतज्ञ ललित ऊरकुडे यांना विहिरीत नाग साप पडला असल्याचे विनोद चौधरी यांनी कळविले.

ऊरकुडे यांनी  कसलाही विलंब न करता सहकारी सर्पमित्र चेतन प्रमोद राखडे, सौरभ ठाकरे यांना घटनास्थळी पाठविले. वीस किलोमीटरचा प्रवास करत चेतन राखडे यांनी विहिरीत उतरून नाग सापाला जिवंत पकडून सुरक्षित ठिकाणी सोडले.यावेळी गुरुदेव सोंदरकर पत्रकार विनोद चौधरी, रामू धोंगडे, प्रणय सोंदरकर, हरिदास कुथे उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये