ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हंसराज अहीर यांच्या निवासस्थानी जिवती तालुक्यातील शेकडो युवकांचा भाजप प्रवेश

सर्वांनी लोकांच्या न्यायासाठी व पक्ष संघठन मजबुत करण्याचे कार्य करावे असे आवाहन

 चांदा ब्लास्ट
जिवती तालुक्यामधील अनेक गावातील विविध पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या निवासस्थानी भाजपामध्ये प्रवेश केला. या सर्व नवप्रवेशित कार्यकर्त्यांचा हंसराज अहीर यांनी पक्षाचा दुपट्टा घालुन सन्मान केला.
दि. २५ सप्टे रोजी पार पडलेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास पक्षाचे चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे विस्तारक खुशाल बोंडे, माजी महापौर सौ. अंजलीताई घोटेकर, माजी उपमहापौर अनिल फुलझेले, भाजपा किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजु घरोटे, जिवती तालुकाध्यक्ष केशव गिरमाजी, जिवती पं.स. चे माजी उपसभापती महेश देवकते, प्रल्हाद मदने, गोविंद टोकरे, राजेश राठोड, सरपंच पुंडलिक गिरमाजी, मोतीराम रोकडे, हनमंत देवकते यांची प्रमुख उपस्थिती होती.
भाजपा व या पक्षाचे नेते समाजाच्या विकासासाठी, लोकांच्या समस्या निवारण्यासाठी सदैव तत्पर राहुन कार्य करीत असल्याने व भाजपा हा पक्ष गोरगरीबांच्या हितासाठी झटणारा असल्याने भाजपामध्ये प्रवेश करीत असल्याच्या भावना या युवकांनी पक्षप्रवेश करतांना व्यक्त केल्या. यावेळी हंसराज अहीर यांनी हर घर जल, घरकुल योजना व पट्ट्यां संदर्भात माहिती घेतली. उपस्थित बांधवांनी जिवती तालुक्यात रस्ते व दमपूर मोहदा, कुंभेझरी व वणी खुर्द या गावांना जोडणाऱ्या पुलाचे काम करून दिल्याबद्दल हंसराज अहीर यांचे आभार मानले.
भाजपा प्रवेश करणाऱ्यांमध्ये दमपुर मोहदा येथील इमामुद्दीन सैयद, राजु शिंदे, मधुकर वाघमारे, दत्ता चिट्टेबोइनवाड, शिवराज जुन्टे, सुभाष मोतेवाड, रामदास मोतेवाड, दिगंबर हरगीले, सद्दाम सैयद, सुभाष हरगीले, राजु कोडापे, श्रीपती पदलवाड, नागनाथ हाडेबाग नरसींग पदलवाड, गणेश चिटबोइनवाड, दिगांबर जाधव, परमेश्वर जाधव, अंकुश मोतेवाड, अंबादास मोतेवाड, कुभेझरी येथील विजय घोडके, अनिल घोडके, किसन घोडके, बालाजी घोडके, किशोर सुर्यवंशी, काशीनाथ गोतावडे, संजय घोसे, राजु दुधमोगरे, विजय कांबळे, दत्ता कांबळे, दगडु मोतेवाड, करण मडावी, वासुदीन सैयद, चंद्रकांत घोडके, संजय मोतेवाड, अमृत मोतेवाड, कमलाकर, गायकवाड, जयराम ठोबरे, तुकाराम आत्राम, परमेश्वर मडावी, रोहीत सीडाम, रमेश आत्राम, दिनेश मडावी, मारोती कोडापे, लक्ष्मण मडावी, सुरज उईके, मानीक मडावी, करपा मडावी, कोंडाकुरले यांच्यासह शेकडो युवकांचा समावेश होता.
याप्रसंगी हंसराज अहीर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना पक्षाच्या धोरणांचा अंगिकार करून सर्वांनी लोकांच्या न्यायासाठी व पक्ष संघठन मजबुत करण्याचे कार्य करावे असे आवाहन केले.
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये