ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भूस्खलन पीडित १६९ परिवारान सोबत आम आदमी पार्टी बसणार उपोषणला

चांदा ब्लास्ट

दिनांक १८/१०/२०२४ शुक्रवार रोजी अमराई वॉर्ड नं. ०१ इथे झालेल्या भूस्खलन विषयावर गजानन मडावी परिवार आणि १६९ कुटुंबासह आम आदमी पार्टी वे.को.ली वणी क्षेत्र, घुग्घुस विरोधात आणि सरकार विरोधात उपोषण व आंदोलन करण्यात येणार आहे.

    दोन वर्ष लुटून गेले परंतु भूस्खलन झालेल्या मडावी परिवाराला तसेच तिथल्या १६९ कुटुंबांना शासना प्रशासन कडून फक्त आश्वासन देण्यात येत आहे परंतु आत्तापर्यंत कुठल्याही तोडगा काढण्यात आलेला नाही वारंवार अधिकारांकडे फेरफटका मारून आता ही गरीब जनता तजली आहे म्हणून आम आदमी पार्टी मार्फत जिल्हाधिकारी साहेबाला असे निवेदन देण्यात आले आहे की येणाऱ्या १८/१०/२०२४ तारखेपासून आम आदमी पार्टी सह सर्व १६९ कुटुंब उपोषणाला बसणार.

  यावेळेस शहर अध्यक्ष अमित बोरकर, उपाध्यक्ष विकास खाडे, युवा अध्यक्ष सचिन सिरसागर, सचिव संदीप पथाडे, रवी शांतलावार, प्रशांत सेनानी, प्रफुल पाझारे, निखिल कामतवार, अनुप नळे, करण बिऱ्हाडे, संतोष सलामे, प्रशांत पाझारे, कुलदीप पाटील, महिला शहर अध्यक्ष उमा तोकलवार, महिला उपाध्यक्ष सोनम शेख, महिला सचिव विपश्यना धनविजय, महिला कोषाध्यक्ष अंजली नगराळे, महिला संघटनमंत्री पुनम वर्मा, रिना पेरपूल्ला, शामला तराला, धम्मदिना नायडू, नईमा शेख, कविता विष्णु भक्त, शोभाताई इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये