ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैद्य व्यावसायिक कोरपना पोलिसाच्या रडारवर

अंतरगाव येथे सुगंधीत तंबाखू विक्रेत्यावर कारवाई ; दोन लाख अठरा हजार सातशे मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट  प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

अवैधरित्या सुगंधीत तंबाखू विक्री, जनावर वाहतूक, रेती तस्करी, दारू विक्री, सट्टापट्टी या विरोधात कोरपनाचे पोलीस निरीक्षक संदीप एकाडे यांच्या नेतृत्वात

कोरपना पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. यामुळे अवैध व्यवसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.

गेल्या महिन्याभरात विविध गुन्ह्याच्या वीस हून अधिक कारवाया करण्यात आल्या आहे. परिणामी अवैध व्यवसायिकांना मोठा चाप बसला आहे. शनिवार दिनांक दोनला अशीच सुगंधीत तंबाखू विक्रेत्याविरुद्ध धडक कारवाई उगारण्यात आली. अंतरगाव बू येथे सिनेस्टाईलणे सुगंधीत तंबाखू विक्रेत्याचा पाठलाग करून स्विफ्ट डिझायर वाहनाच्या डीक्कीतून मजा चे २० नग डब्बे एकूण अठरा हजार सातशे रुपयाचा माल जप्त करण्यात आले.

तसेच या सोबत स्विफ्ट डिझायर वाहन अंदाजे दोन लाख रुपये किंमतीचे वाहन ताब्यात घेण्यात आले.असा एकूण दोन लाख अठरा हजार सातशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्यावर अपराध क्रमांक ४२/२०२४ कलम ३२८ ,१८८,२७२,२७३,३४ भांदवी सकलम २६ (२) अ ३० (२) ,३,४,५९(अ ) अन्नसुरक्षा आणि मानवी २००६ सह कलम १३०/१७७ मो वा का अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील दोन आरोपीला अटक करण्यात आली असून एकाचा कसून शोध सुरू आहे.अवैध व्यवसायिकावर होणाऱ्या सातत्यपूर्ण कारवायामुळे कोरपना हद्दीतील अनेक अवैध व्यवसाय कायमस्वरूपी बंद झाले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये