ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ तर्फे गरजू महिलांकरिता बयूटी पार्लर प्रशिक्षणचे उद्घाटन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ आपल्या सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांद्वारे विविध उपक्रम राबवत आहे, त्यांच्या कल्याणकारी कार्यात महिलांना विशेष प्राधान्य देत आहे. त्याचाच एक भाग म्हणून 05 मार्च रोजी सौंदर्य या महिला बयूटी पार्लर प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या प्रशिक्षणाचे उदघाटन संयुक्ता लेडीज क्लबच्या अध्यक्षा श्रीमती रचना कंसल व समिती सदस्यांनी केले तसेच श्रीमती रचना कंसल यांनी मोलाचे मार्गदर्शन केले व सर्व महिलांचे मनोबल वाढवले. सी.एस. आर.माणिकगढ यांनी या प्रशिक्षणाचे आयोजन केले होते.

यामध्ये बैलमपूर, गोवारीगुडा, बॉम्बेझरी, नोकारी व लिंगनडोह या गावातील एकूण 15 महिला सहभागी झाल्या होत्या. हे प्रशिक्षण दररोज 2 तास चालणार असून एकूण तीन महिने चालणार आहे. त्यासाठी बैलमपूर येथील अनुभवी प्रशिक्षकाचीही नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशिक्षणाच्या अंतिम टप्प्यात, सर्व लाभार्थ्यांना परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र दिले जाईल.

या उदघाटन प्रसंगी श्रीमती रचना कन्सल यांनी बोलतांना सांगितले कि जास्तीत जास्त महिलांनी या प्रशिक्षनाचा लाभ घ्यावा व या पासून प्रशिक्षित झालेल्या महिलांना संयुक्ता लेडीस क्लब तर्फे मेक अप करिता बोलावू तसेच महिलांशी संबंधित अशा प्रशिक्षणाला चालना देण्याचे आश्वासन दिले.

या प्रशिक्षनाला यशस्वी करण्यास माणिकगढ सी. एस. आर. टीम ने अथक प्रयत्न केलेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये