ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिनगाव येथील शेतकऱ्यांची हरभऱ्याची गंजी पेटविली

यामध्ये 45 हजार रुपयांचे नुकसान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

येथून जवळच असलेल्या सिंनगांव जहांगीर येथील शेतकरी शरद संजय काकड यांच्या पांगरी माळी शिवारात असलेल्या शेतात हरभरा पिकाची काढणी करून गंजी लावली होती, अज्ञात आरोपी ने 5 मार्च च्या रात्री या गंजीला आग लावली, यामध्ये 45 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे,10 क्विंटल हरभरा ची काढणी करून गंजी लावली होती.

याप्रकरणी शेतकरी शरद काकड यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास हेड कॉन्स्टेबल माधव कुटे करीत आहे,गेल्या काही दिवसांपासून शेतातील हरभरा पिकांच्या गंजीला आगी लावण्यात येत आहेत. आगी लावणाऱ्या आरोपी वर कडक कारवाई करण्याची मागणी शेतकरी करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये