ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा वाहतुक पोलीस विभागतर्फे संपुर्ण वर्धा जिल्हयात विशेष मोहीम

एकुण 342 वाहन धारकांवर मोटर वाहन कायदा नुसार कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्हयात होणारे अपघात कमी करण्यासाठी तसेच वाहतुक नियमांचे नागरिकांनी पालन करावे याकरिता वर्धा जिल्हा वाहतुक पोलीस विभागतर्फे संपुर्ण वर्धा जिल्हयात विशेष मोहीम राबवली जात आहे. त्याअनुशंगाने दिनांक 27/06/2023 रोजी विशेष मोहीम दरम्यान संपुर्ण जिल्हयात 141 विना हेल्मेट धारकांवर 54 विना सिटबेल्ट धारकांवर 00 दारू पिवुन वाहन चालविणा-यांवर व ईतर मोटर वाहन कायदानुसार एकुण 342 वाहन धारकांवर मोटर वाहन कायदा नुसार कार्यवाही करण्यात आली असुन त्यामध्ये 182500 रूपये दंड आकारण्यात आला आहे. तसेच सदर विशेष मोहीम दररोज संपुर्ण वर्धा जिल्हयात राबविण्यात येणार असुन वर्धा पोलीस दलातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी विना हेल्मेट मोटर साईकल, विना सिटबेल्ट चारचाकी वाहन, दारू पिवुन वाहन चालवु नये. तसेच वर्धा जिल्हयात टोईंग व्हॅन सुरु करण्यात आली आहे. नागरीकांनी नो पार्किंग मध्ये आपली वाहने ठेवल्यास टोईंग व्हॅन व्दारे उचलून त्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. वाहतुकीचे नियमनांचे पालन करावे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये