ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा कारागृहातील बंदीबांधवांना मिळणार आता एका क्लिकवर त्यांची संपूर्ण माहिती

चांदा ब्लास्ट

वर्धा कारागृहातील असलेल्या बंदीबांधवांना त्यांच्या शिक्षेचा कालावधी, कोर्टाची तारीख यासह इतर बाबीची तात्काळ माहिती व्हावी यासाठी वर्धा जिल्हा कारागृहाने आय सी जे एस अंतर्गत टच स्क्रीन किओस्क सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे या क्लिकवर माहिती उपलब्ध होईल अशा पद्धतीचे आय सी जे एस अंतर्गत टच स्क्रीन किओस्क मशीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रणालीचा शुभारंभ मुख्य न्या. श्री संजय भारुका प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्धा यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे म्हणून व्ही‌ पी.अदोने सो.जिल्हा न्यायाधीश क्र.3 तथा अति सत्र न्यायाधीश वर्धा व्ही.डी.देशमुख सचिव जिल्हा न्यायाधीश वर्धा विधी सेवा प्राधिकरण वर्धा व श्री सुहास आर.पवार अधीक्षक जिल्हा कारागृह वर्धा श्री नितीन क्षिरसागर उपअधिक्षक जिल्हा कारागृह वर्धा श्री सुहास नागमोते तुरुंगाधिकारी वर्धा यांच्या प्रमुख उपस्थितीत दरम्यान, या प्रणालीचे उपकरणाचा शुभारंभ वर्धा जिल्हा कारागृहात नुकताच करण्यात आला.कारागृहात अनेक कैदी असतात. एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या बंदीबांधनांची माहिती ठेवणे आणि वेळोवेळी त्यांच्या कोर्टाच्या तारखा, वैयक्तिक माहिती व इतर बाबीं साठी वेगळा कर्मचारी वर्ग कार्यरत ठेवावा लागतो. याशिवाय बंदीबांधनांना देखील तर

या बाबतीत फारसे लक्षात राहत नाही. ही बाब लक्षात घेता त्यांना ही माहिती मिळण्याकरिता ही कारागृह विभागाने खास प्रणाली विकसित केली आहे या प्रणालीद्वारे बंदी बांधनांना त्याची वैयक्तिक सर्व माहिती सहज अर्थात एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. या सुविधेमुळे बंदीबांधवांना एका क्लीक वर त्यांच्या स्वताची, त्यांच्यावर असलेल्या केसेसची संपूर्ण माहिती, कोर्टातील सुनावणी तारीख, नातेवाइकां सोबत मुलाखत बाबत माहिती प्राप्त होणार आहे. वर्धा जिल्हा कारागृहात आय सी जे एस अंतर्गत टी एस किओस्क सुविधा प्रसंगी प्रणालीच्या शुभारंभप्रसंगी मुख्य न्यायाधीश श्री संजय भारुका प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्धा सोबत वर्धा कारागृह अधीक्षक श्री सुहास पवार नितीन क्षिरसागर उपअधिक्षक कारागृह वर्धा सुहास नागमोते तुरुंगाधिकारी वर्धा श्री शंकर वाघमारे श्री अमित कोठारकर श्री आशुतोष बोंडे श्री शरद सरसरे श्री रामराव गायकवाड श्री ध्रुवास पठाडे श्रीमती आरती गायकवाड श्री द संदीप देशमुख आदी उपलब्ध होते. त्यावेळी बांदिबांधवाना कामासाठी बॅरेक बाहेर काढले जातात त्यावेळी ते काहीही या प्रणालीचा उपयोग करू शकता बंदिवान अशिक्षित आहेत त्यांना तेथे उपलब्ध असलेला कर्मचारी ही माहिती वाचून दाखवू शकतो यासाठी बंदीबांधवानां विशिष्ट कोड देण्यात आलेला आहे.

तो कोड त्या प्रणालीत समाविष्ट केल्यावर संबधित माहिती उपलब्ध होणार आहे उपस्थित असलेल्या बंदी बांधवानां त्यांच्या शिक्षेचा कालावधी, कोर्टाची तारीख नातेवाईकांच्या भेटी खाजगी रक्कम यासह इतर बाबी तत्काळ माहिती व्हावी यासाठी वर्धा जिल्हा कारागृहात एका क्लिकवर माहिती उपलब्ध होईल अशा किओस्क मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहे. या प्रणालीचा शुभारंभ न्या. श्री संजय भारुका यांच्या हस्ते नुकताच करण्यात आलेला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये