ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जंगलात फिरताना दोन इसमाला वन विभागाने घेतले ताब्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

बल्लारपूर – वन विभागाने नागरिकांना जंगलात जाऊ नये असे आव्हान केल्या नंतरही नागरिक जंगलात  जाऊन आपला जीव गमावतात. जंगलात आदमखोर वाघ असल्याने वाघाने आत्ता पर्यंत तीन-चार इसमावर हल्ला करून शिकार केली आहे. एका इसमाचे शरीराचे अर्धे मास भक्षण केले आहे.

सामाजिक संघटना आणि राजनितिक पक्षाने वन विभागाला निवेदन देऊन आदमखोर वाघाचा बंदोबस्त करावे अशी विनंती केली आहे. त्याअनुसार वन विभागाने आदमखोर वाघाला पकडण्याकरिता बंदोबस्त करीत लाईव्ह कॅमेरा लावलेले आहे. जंगलात राखीव वन खंड क्र.493 मधील वनात दोन इसम 1)चंदन तिलोकांनी गांधी वॉर्ड, 2)सारंग राहुलगडे, साईबाबा वॉर्ड, बल्लारपूर, यांनी अपप्रवेश करून जंगलात फिरत असतांना वनातील लाईव्ह कॅमेरे मध्ये दिसून आले. वनविभागाचे अधिकारी यांनी दोघांनाही ताब्यात घेवून झडती घेतली असता त्यांचा जवळ ज्वलनशील साहित्य आढळून आले त्यामुळे वनात अपप्रवेश करून वनात आग लावण्याचा दृष्टीने ज्वलनशील साहित्य नेल्या प्रकरणी व आदमखोर वाघ जेरबंद मोहिमे दरम्यान शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याबाबत त्यांचे विरुद्ध भारतीय वन अधिनियम 1927चे कलम 26(1)ब, ड, नुसार प्राथमिक वन गुन्हा क्र,08962/224042दि,17-03-24अन्वये वन गुन्हा नोंदवून त्याचे कडील साहित्य (मोटारसायकल व मोबाईल )जप्त करण्यात आले.

वन विभाग वेळोवेळी आवाहन करीत आहे की जंगलात आदमखोर वाघ असल्याने कोणीही कोणत्याही कामाकरिता जंगलात जाऊ नये आत्ता पर्यंत तीन व्यक्तीचा नरडीचा घोट वाघाने घेतला आहे. जंगलात कोणीही व्यक्ती फिरत असतांना दिसला की वन विभाग कडक कारवाई करणार आहे.

सदर प्रकरणात पुढील तपास मध्य चांदा वनविभाग चंद्रपूरचे उपवनरक्षक श्रीमती श्वेता बोड्डू व सहाय्यक वनरक्षक आदेश कुमार शेडगे यांचा मार्गदर्शनातं वनपरीक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे हे करीत आहे. सदर कारवाई दरम्यान क्षेत्र सहाय्यक पठाण, रामटेके, पुरी, वन रक्षक सुधीर बोकडे, तानाजी कामले, परमेश्वर आणकडे, रणजित दुर्योधन, कु, वैशाली जेणेकर, माया पवार, सुनील नन्नावरे, मनोहर घाईत, धर्मेंद्र मेश्राम, देशमुख, व इतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये