ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महावितरणची थकबाकी ५१६ कोटी १९ लाखांवर!

थकबाकीसाठी वीज पुरवठा खंडित करणे वसुली मोहीम जोरात

चांदा ब्लास्ट

       महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयातील घरगुती, वाणिज्यिक, औदयोगिक, सरकारी कार्यालये, सार्वजनिक पाणिपुरवठा योजना , कृषिपंप योजना ईत्यादिंची थकबाकी ५१६ कोटी १९ लाख, झाली व आता मार्च महिन्यात वर्षभराचा लेखाजोखा मांडणे अगत्याचे असल्याने, घरघुती, वाणिज्यिक, औदयोगिक, सरकारी कार्यालये व सार्वजनिक पाणिपुरवठा योजनेच्या थकबाकीदारां विरोधात वसुली व वीजपुरवठा खंडीत करण्याची मोहिम राबविण्यात येत असून महावितरणची आर्थिक स्थिती समजून घेवून ग्राहकांनी थकबाकी भरून महावितरण या आपल्याच कंपनीला सहकार्य करावे असे विनंतीवजा आवाहन मुख्य अभियंता श्री.सुनिल देशपांडे यांनी केले आहे.

        चंद्रपूर परिमंडळात चालू वर्षातील व मागील वर्षाच्या एकंदरीत मागणीपैकी घरगुती ग्राहकांकडुन १३ कोटी ९५ लाख येणे आहे, तर वाणिज्यिक गाहकांकडुन ४ कोटी ७६ लाख येणे आहे. औदयोगिक ग्राहकांकडुन ३ कोटी १५ लाख, ग्रामीण व शहरी पाणीपुरवठा योजनांकडून ४ कोटी ३६ लाख तर, सरकारी व इतर लघुदाब ग्राहकांकडून ५ कोटी ६१ लाख, कृषिपंपधारक ग्राहकांकडून ३५० कोटी ५१ लाख व पथदिव्यांची थकबाकी १३४ कोटी ३५ लाख झाली आहे.

त्यामुळे नोव्हेंबर २०२२ ते जानेवारी २०२४ दरम्यान चंद्रपूर परिमंडळातील १२ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित खंडीत करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्हयातील ७ हजार २४४ तर गडचिरोली जिल्हयातील 4 हजार ७८२ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत नेहमीसाठी म्हणजे कायमस्वरूपी करण्यात आला आहे.

    जिल्हानिहाय थकबाकी

        चंद्रपूर जिल्हा – घरगुती ग्राहकांकडुन ९ कोटी ६० लाख येणे आहे, तर वाणिज्यिक गाहकांकडुन ३ कोटी ९५ लाख येणे आहे, औदयोगिक ग्राहकांकडुन २ कोटी १४ लाख थकबाकी वसुली येणे आहे, ग्रामीण व शहरी पाणीपुरवठा योजनांकडून ३ कोटी ८४ लाख येणे आहे तर, सरकारी व इतर लघुदाब ग्राहकांकडून २ कोटी २४ लाख, कृषिपंपधारक ग्राहकांकडून २३६ कोटी 21 लाख व पथदिव्यांची थकबाकी ७० कोटी ७६ लाखाच्या घरात पोहोचली आहे.

      गडचिरोली जिल्हा -घरगुती ग्राहकांकडुन ४ कोटी ३५ लाख येणे आहे, तर वाणिज्यिक गाहकांकडुन ८१ लाख येणे आहे,औदयोगिक ग्राहकांकडुन १ कोटी १ लाख थकबाकी वसुली येणे आहे. ग्रामीण व शहरी पाणीपुरवठा योजनांकडून ५२ लाख येणे आहेत. सरकारी व इतर लघुदाब ग्राहकांकडून ३ कोटी ३७ लाख, कृषिपंपधारक ग्राहकांकडून ११४ कोटी ३० लाख व पथदिव्यांची थकबाकी ६३ कोटी ५९ लाखाच्या घरात पोहोचली आहे.

     नोटीशीची मुदत संपल्यामुळे घरगुती ग्राहकांसोबतच आता पाणीपुरवठा योजना, थकबाकीत असलेले सरकारी कार्यालये, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था व तत्सम थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात येत आहे. त्यामुळे वर्षभरात या सर्व वर्गवारीतील थकबाकीदार ग्राहकांविरोधात सातत्याने वीजपुरवठा ख्ंडीत करण्याची मोहिम सुरु आहे.

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग यांनी ३१ मार्च २०२३ नुसार दिलेल्या आदेशान्वये १ ऑगस्ट २०२३ पासून महावितरणच्या रोखीत वीजबिल भरण्याच्या कमाल रकमेवर मर्यादा आहे. महावितरणचे सर्व ग्राहक (लघुदाब कृषी वर्गवारी सोडून) यांना दरमहा कमाल मर्यादेत केवळ ५ हजार रुपयांपर्यंतचे वीजबील भरता येणार आहे. तसेच लघुदाब कृषी वर्गवारीतील ग्राहकांना वीजबिल रोखीत भरण्यासाठीची दरमहा कमाल मर्यादा १० हजार एवढी राहणार आहे.

      महावितरणच्या वतीने वीजग्राहकांना www.mahadiscom.in या संकेतस्थळावर तसेच महावितरणच्या मोबाईल ॲपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाइन पध्दतीने विनामर्यादा वीजदेयकाचा भरणा फक्त आणि फक्त वीज बिलाची पूर्ण रक्कम भरून करता येवू शकतो. तसेच महापॉवर पे या सुविधेच्या माध्यमातुन नजीकच्या किराणा दुकानात सदर सुविधा उपलब्ध असल्यास महापॉवर पे च्या माध्यमातुन देखील वीजबिल चा भरणा करता येणार आहे.

      पार्ट पेमेंट किंवा तुकडा वीज बिल भरणा आता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांना ऑनलाइन जर विज बिल भरायचे असेल तर ते पूर्ण विज बिल भरावे लागते याची नोंद घ्यावी.

    या प्रणालीची कार्यपध्दती महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या पध्दतीत ग्राहक वीजदेयकाचा भरणा क्रेडिट/डेबिटकार्ड, नेटबँकींग व युपीआय इत्यादी इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत करू शकतो. तसेच भारत बिल पेमेंट (BBPS) मार्फत देखील वीज बिल भरणा करता येऊ शकतो. या व्यतिरिक्त महावितरणने रु.५०००/- पेक्षा जास्त बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना RTGS/NEFT द्वारे देयक भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी लागणारी आवश्यक ग्राहक निहाय बँकेच्या माहितीचा तपशिल वीजबिलावर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. क्रेडिट कार्ड वगळता इतर सर्व पध्दतीने वीजबिल भरणा निशुल्क आहे. तसेच ऑनलाईन पध्दतीने देयकाचा भरणा केल्यास बिल रकमेच्या ०.२५ टक्के (जास्तीत जास्त रु.५००/-इतकी सवलत देखील देण्यात आलेली आहे.

       दिवसेंदिवस वीजेचा वापर वाढतच आहे व महावितरणच्या अस्तित्वासाठी ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक युनिटची वसुली अत्यावश्यक असून वसुल केलेल्या पैशातूनच वीजखरेदी करून महावितरण ग्राहकांप्रति जबाबदारी पार पाडत वीजखरेदी करून वीजपुरवठा करीत आहे ही वस्तुस्थिती आहे. वीजबिल वसुलीतून प्राप्त पैशामधून ८५ टक्के रककम वीजखरेदीवर केली जाते हे आता ग्राहकांही जाणून आहेत.

     महावितरण प्रथम वीजपुरवठा करते व नंतर वीजबिल देते. या उलट अनेक सेवासांठी आधी पैसे व नंतर सेवा असे असते.तरी पण वीजकंपनीच्या अभियंता कर्मचारी वर्गास मारहान, अपमान सहन करून ग्राहकांनी वेळेत वीजबिल भरण अपेक्षित असतांना त्यांना घरी बसून विज बिल भरण्याची सोय उपलब्ध असताना, वसुलीसाठी त्यांच्या दारी जावे लागत आहे.

    महिनाभराच्या वीज वापरण्यासाठी महिनाभर वेळ हाती असताना थकबाकीदार ग्राहक वेळेवर विज बिल भरत नाही आणि मग नाईलाजाने महावितरणला त्यांचा वीजपुरवठा खंडित करावा लागतो.

    तर, वीज पुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांना पुन्हा पुनर्जोडणी साठी ऑफिस मध्ये जाऊन पुनर्जोडणी जोडणी शुल्क भरणे, यासाठी ऑनलाईन सुविधा ही आहे तरी थकबाकी साठी वीजपुरवठा खंडित झालेले ग्राहक स्वतःहुन त्रास स्वतःवर ओढवून घेतात. तर, दुसरीकडे महावितरणच्या कर्मचार्यांना, थकबाकीदारांना वारंवार फोन करून सांगावे लागते विज बिल भरा म्हणून, विनंती करावी लागते, घरी जाऊन सांगावे लागते.

     वीजग्राहकांना २४ तास वीजपुरवठा मिळावा यासाठी महावितरण वीज निर्मिती कंपण्याकडून वीजखरेदी करते व वसुल झालेल्या पैशातूनच वीज खरेदी करत असते. वीज निर्मिती कंपन्या कोळसा, नैसर्गिक तेल वीजनिर्मितीसाठी खरेदी करतात व त्यापण कोळसा व तेल कंपण्यांना पैसे देणे लागतात.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये