भद्रावतीत ३ मार्चला केंद्रीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा स्नेहमिलन सोहळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
केंद्रीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा स्नेह मिलन सोहळा भद्रावती शहरात रविवार दि.३ मार्चला स्थानिक स्वागत सेलिब्रेशन येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
आपल्या सोबतच्या जुन्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसोबत एकत्रित आयुष्य घालवलं परंतु सेवानिवृत्तीनंतर एकमेकांपासून दूर सारल्या गेलो. त्याला उजाळा देण्याकरिता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा स्नेहमिलन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे.ही संकल्पना सीजीएचएस समितीचे सल्लागार सदस्य मनोहर साळवे यांनी स्थानिक लोकमान्य विद्यालयात सभेचे आयोजन करून मांडली.यास उपस्थित सेवानिवृत्त कर्मचारी यांनी सहमती दर्शविली. रविवार दि.३ मार्चला होऊ घातलेल्या सेवानिवृत्त कर्मचारी स्नेहमिलन सोहळ्यात ७५ वर्षे पूर्ण केलेल्या तसेच त्यांच्या विवाहास ५० वर्षे पूर्ण झालीत अशा जवळपास १२५ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येणार आहे. जवळपास ५०० हून अधिक सेवानिवृत्त कर्मचारी सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.
या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सोहळा समितीचे आयोजक मनोहर साळवे यांनी केले आहे.