ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोडशीच्या मातीचा सुगंधच कीर्ती रुपी दरवळणारा – सुरेश राजुरकर

स्नेहमिलन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना – पैनगंगा विदर्भ नदीच्या संगमावरती वसलेल्या कोडशी बू, गांधीनगर परिसराचा सामाजिक,सांस्कृतिक,राजकीय शैक्षणिक,कृषी क्षेत्रात वैभवशाली वारसा अतिशय समृद्ध आणि प्रेरणादायी आहे. या मातीतील लेकरांच्या कर्तुत्वशील कामगिरीमुळेच इथला सुगंध किर्ती रुपी दरवळणारा आहे असे मनोगत कोडशी बू चे सुपुत्र, जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुरेश राजूरकर यांनी

स्नेहबंध परिवार कोडशी बू – गांधीनगर तर्फे आयोजित स्नेह मिलन व गुणवंत सत्कार सोहळा प्रसंगी व्यक्त केले.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे माजी न्यायाधीश व विधी तज्ञ ऑड,अनिल ढवस तर प्रमुख पाहुणे म्हणून ऑड, वासुदेव वासेकर, जिल्हा परिषदेचे माजी सी ई ओ श्रीधरराव मालेकर, इंजी दिलीप झाडे, प्रा. सुरेश मोहितकर, अरुण मालेकर, भाऊराव मोहितकर, वासुदेव मालेकर, दिनकर मालेकर,सुरेश मालेकर, जिल्हा परिषद सदस्य विना मालेकर, कोडशीचे सरपंच उमेश कोल्हे, पोलीस पाटील पांडुरंग जरीले , विठ्ठल वासेकर, लोडबा सातपुते, लक्ष्मण सुरपते, दुर्गा मोहितकर आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना ते म्हणाले जगाच्या पाठीवर कुठेही जरी असलो तरी मातृभूमीची ओढ ही कायमच प्रत्येकाला असते. येथील संस्कार व जडणघडणीतूनच खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्व घडतं असतात. हेच प्रेरणात्मक स्त्रोत कोडशी बू या गावातून मला लाभलं. त्यामुळे या भूमीचा मी सदैव ऋणी राहील असे विचार त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

ऑड, ढवस यांनी उपस्थितांना संबोधित करताना प्रत्येकाने आपले ध्येय निश्चित करून त्यादृष्टीने कार्य सुरू ठेवल्यास निश्चितच त्याला यश मिळते. अनुभव हीच यशाची खरीखुरी शिदोरी आहे. विद्यार्थ्यांनी हेच यश कठोर मेहनतीतून सिद्ध करावे असे आवाहन त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. या कार्यक्रमात गावातील ८० ज्येष्ठ व्यक्तींचा तसेच दहावी बारावीत ७५ टक्के हून अधिक गुण प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थितानी गावच्या भौगोलिक परिस्थिती व विकासपर दृष्टी वर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंजिनियर दिलीप झाडे संचालन डॉ जोत्सना मोहीतकर व सुमती राजूरकर तर आभार दिवाकर मोहितकर यांनी मानले.

कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी महेश मालेकर, गोपाल मालेकर, दिलीप मालेकर, पद्माकर मोहितकर, विनोद मालेकर व स्नेहबंध परिवारातील सर्व सदस्य व गावकरी यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी कोडशी बू, गांधीनगर येथील ग्रामस्थांची मोठ्या संख्येनी उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये