ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पंचायत समिती कोरपनाच्या गटशिक्षणाधिकारी पदी श्री कल्याण जोगदंड रुजू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

पंचायत समिती कोरपना येथे कल्याण जोगदंड,विस्ताराधिकारी शिक्षण यांची गटशिक्षणाधिकारी पदी वर्णि लागली असून त्यांनी कार्यभार नुकताच सांभाळला आहे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर श्री पुलकित सिंग यांनी तसे पत्र काढून त्यांना हा पदभार दिला आहे. तत्कालीन गटशिक्षणाधिकारी सचिन मालवी यांची प्रशासकीय बदली राजुरा पंचायत समिती येथे झाल्याने पद रिक्त होते. त्यांच्या निवडीबद्दल पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती शाखा कोरपणाच्या वतीने यांचे स्वागत करण्यात आले. व पुढील वाटचाली करिता शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी बोलताना श्री जोगदंड म्हणाले की शिक्षकांच्या सर्व समस्या तात्काळ सोडवण्यात येतील तसेच तालुक्यातील नवोदय शिष्यवृत्ती एन एम एम एस व सर्व स्पर्धा परीक्षा क्रीडा स्पर्धा व शासनाने दिलेल्या सर्व उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येईल व कोरपणा तालुका निपुण महाराष्ट्र मध्ये देखील चांगली कामगिरी करेल असे आश्वासन दिले. यावेळी त्यांचे स्वागत केंद्रप्रमुख श्री विलास देवाळकर यांनी केले, या प्रसंगी जिल्हा परिषद शिक्षक कर्मचारी पतसंस्था गडचांदूर चे उपाध्यक्ष, काकासाहेब नागरे हे उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये