घोडपेठ येथे बैलजोडी सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
विजयी बैलजोडी धारकांचा पारीतोषिकासह सन्मान

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहीर यांच्या विशेष पुढाकाराने दरवर्षीप्रमाणे यंदाही दि. 22 ऑगस्ट 2025 रोजी भारतीय जनता पार्टी, घोडपेठच्या विद्यमाने शेतकऱ्यांचा आनंददायी सण बैल पोळा निमित्त भव्य बैलजोडी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
राष्ट्रीय मागासवर्ग आयोग अध्यक्ष तथा पुर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराजजी अहीर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमास सर्वश्री. हरीश्चंद्रजी अहीर, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे, चंद्रपूरचे माजी उपमहापौर अनिल फुलझेले, भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, भद्रावती भाजपा शहराध्यक्ष सुनिल नामोजवार, ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष विनोद शेरकी, भाजपा जिल्हा सचिव पूनम तिवारी, गौतम यादव, घोडपेठचे सरपंच अनिल खनके, उपसरपंच प्रदिप देवगडे, श्यामल अहीर, माजी जि.प. सदस्य विजय वानखेडे, केशव लांजेवार, विश्वनाथ निमकर, तालुका अध्यक्ष श्यामसुंदर उरकुडे, अर्जुन लांजेवार, विश्वहिंदू परिषदेचे अशोक येरगुडे यांचेसह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
उपस्थित शेतकरी बांधवांना हंसराज अहीर यांनी बैल पोळ्याच्या शुभेच्छा दिल्या. हा पारंपारीक सोहळा निरंतरपणे कायम राहण्याकरिता शेतकरी बांधवांनी पशुपालनातून गौरक्षणाचे संरक्षण व संवर्धन करून देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे आवाहन केले. अन्य मान्यवरांनी सुध्दा समयोचित मार्गदर्शन केले.
याप्रसंगी बालगोपालांनी शिवशंकर, माता पार्वती व श्रीगणेशजींची पारंपारिक वेशभूषा परिधान करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. बैल पोळ्या निमित्त बैलजोड्यांची देखणी सजावट करण्यात आली.
रघुवीर अहीर यांनी या स्पर्धेत सहभागी झालेल्या सजावटीचे पाहुण्यांच्या उपस्थितीत निरीक्षण करून प्रथम ते पाचव्या स्थानापर्यंतच्या बैलजोडी मालकांचा शाल, स्मृतीचिन्ह व रोख राशी देवून सन्मान केला. पोळा हा शेतकऱ्यांचा सण असून बैलांचा सन्मान करण्याचा दिवस आहे. या पारंपारिक उत्सवात समाजातील सर्व घटकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभल्यामुळे कार्यक्रम यशस्वी झाला.