ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सेंट्रीगच्या लोखंडी प्लेटा चोरणाऱ्या अज्ञात चोरांचा पोलीसांनी केला एक तासात गुन्हा उघड

आरोपी अटकेत एकुण 59 हजारांचा माल हस्तगत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

      दिनांक 29/04/2024 रोजी यातील फिर्यादी नामे प्रविण वासुदेवराव बावणकर वय 48 वर्ष रा. गजानन नगर, साहु हॉस्पीटल जवळ वर्धा यांनी पो स्टे वर्धा शहर येथे येउन तकार दिली कि, ते सिमेंट रोड व नाली बांधकामाचे ठेकेदार असुन त्यांचे बांधकाम सेवाग्राम रेल्वे स्टेशन परीसरात सुरू आहे, दिनांक 29/04/2024 रोजी सकाळी 10/30 वा चे सुमारास ते रेल्वे स्टेशन सेवाग्राम येथे मजुरांन कडुन नालीचे बांधकाम करीत असता एक ऑटो सेवाग्राम रेल्वे स्टेशन जवळ आला व त्यामधुन दोन ईसम खली उतरले व तिथे त्यांचे सेंट्रींगच्या ठेउन असलेल्या लोखंडी प्लेटा ऑटोत टाकत असतांना त्यांना दिसल्याने त्यांनी त्यांला आवाज दिला असता ते तेथुन पळुण गेले, तेव्हा पाहणी केली असता 3 सेंट्रींगच्या लोखंडी प्लेटा प्रती प्लेट 3000/- रू प्रमाणे 9000/- रू च्या दिसुन आल्या नाही, वरूण अज्ञात चोरटयाने चोरूण नेली, अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरूण पो स्टे वर्धा शहर येथे गुन्हे नोंद करण्यात आले.

पोलीस स्टेशन वर्धा शहर येथील गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख पोहवा शैलेश चाफलेकर यांना गुप्त बातमीदारा कडुन माहीती मिळाली कि, एक ऑटो सेंट्रींगच्या लोखंडी प्लेटा घेउन मशानघाट कडे जाणारे रोडवर पुलाखाली उभा आहे, अशा मिळालेल्या माहीती वरूण पोहवा शैलेश चाफलेकर व त्यांचे टिमने शिताफिने मशानघाट रोडवर पुलाखाली जाउन शोध घेतला असता एक ऑटो व दोन ईसम संशयास्पद स्थितीत उभे दिसला, व त्या ऑटोत 3 सेंट्रींगच्या लोखंडी प्लेटा दिसुन आल्या, त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारला असता त्यांनी आपले नाव 1) जितेंद्र सदाशिव टोंगे वय 38 वर्ष रा. रामनगर वर्धा 2) रोहित किसणराव मसराम वय 24 वर्ष रा राणी दुर्गावती नगर, बुरड मोहल्ला, ईतवारा वर्धा असे सांगीतले, वरूण त्यांना ऑटोत असलेल्या 3 सेंट्रींच्या लोखंडी प्लेटा बाबत विचारणा केली असता त्यांनी चोरीच्या असल्याचे सांगीतल्याने त्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेउन त्यांचे ताब्यातुन 1) चोरी केलेल्या 3 सेंट्रींग प्लेटा किमत 9000/- रू 2) एक ऑटो कमांक एम एच 31 ए सी 6191 किमत 50,000 /- रू असा एकुण किमत 59,000/- रू चा माल हस्तगत केला, वरूण त्यांना अटक करूण वर्धा पोलीसांनी एक तासात गुन्हा उघडकिस केला.

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक नुरुल हसन, मा. अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. सागर कवडे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा प्रमोद मकेश्वर, पोलीस निरीक्षक वर्धा पराग पोटे, यांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस हवालदार शैलेश चाफलेकर, पवन लव्हाळे, पोलीस शिपाई नंदकिशोर धुर्वे, उज्वल घंगारे, सर्व पोलीस स्टेशन वर्धा शहर यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये