ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिवती तालुक्यातील जमीन वनक्षेत्रातून वगळण्याचे खरे हक्कदार आमदार देवराव भोंगळेच!

माजी आमदार सुभाष धोटे यांची श्रेय घेण्याची धडपड हास्यास्पद आणि चुकीची

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

भाजपचे तालुकाध्यक्ष दत्ता राठोड यांची स्पष्टोक्ती

जिवती :- जिवती तालुक्यातील ११ गावांमधील ८,६४९.८०९ हेक्टर आर वनजमीन वनक्षेत्रातून वगळण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला असून, यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या यशाचे संपूर्ण श्रेय आमदार देवराव भोंगळे यांच्या अथक प्रयत्नांना देण्यात येत आहे. भाजपचे जिवती तालुका अध्यक्ष दत्ता राठोड यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नाच्या निराकरणासाठी आमदार भोंगळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या समर्पित प्रयत्नांमुळेच हा ऐतिहासिक निर्णय शक्य झाला. निवडणुकीच्या प्रत्येक भाषणामध्ये आमदार देवराव भोंगळे यांनी जिवती तालुक्यातील जटील असलेल्या पट्टयाचा प्रश्न “मी सोडवणार” अशा प्रकारची वाचता प्रत्येक सभेच्या प्रचारामध्ये त्यांनी वापरलेली होती. माजी आमदार सुभाष धोटे यांनी या यशाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करणे पूर्णत्व हास्यास्पद असल्याचे राठोड यांनी स्पष्ट केले.

सत्य काय आहे.

आमदार देवराव भोंगळे यांना राजुरा विधानसभेची उमेदवारी मिळताच, त्यांनी जिवती तालुक्यातील गावोगावी जाऊन, अनेक गावात प्रचाराची काॅर्नर सभा, सभा व रॅली दरम्यान मला जिवती तालुक्यातील वनजमिन पट्टे, सिंचन व्यवस्था, जिवती नगरपंचायत येथील रखडलेले घरकुल, तालुक्यातील विवादित वनक्षेञ वनक्षेत्रातून वगळण्याकरिता प्रयत्न करण्यासाठी मला निवडून द्या, यासाठी तालुक्यातील मतदारांना साद घातली.

काँग्रेस पक्षाचे आमदार पदासाठी उभे असलेले उमेदवार यांनी कुठेही प्रचारादरम्यान आम्ही विवादित वनक्षेञ वगळू, आपल्याला पट्टे देऊ असे कुठेही चकार शब्द काढले नाही शिवाय माजी आमदार धोटे यांनी त्यांच्या १० वर्षे आमदार कालावधीत वन जमीन पट्टे असो की, कोदेपूर, गुडशेला व जिवती येथील रखडलेल्या सिंचन तलाव साठी प्रयत्न केले नाही किंवा नगरपंचायत जिवतीचे रखडलेल्या घरकुलसाठी प्रयत्न केले नाही. राज्याचे मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस व राज्याचे महसूल मंञी आमदार देवराव भोंगळेच्या पाठपुराव्याचा विचार करून न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करुन, जिवती तालुक्यातील विवादित वनक्षेत्रात असलेली ११ गावांमधील ८,६४९.८०९ हेक्टर आर. वनजमीन वनक्षेत्रातून वगळून जिवती तालुक्यातील ११ गावांमधील जनतेला न्याय दिलेला आहे, हेच सत्य असल्याचे जनमानसात चर्चा सुरू आहे.

     विरोधक तालुक्यांतील जनतेला कधी पट्टे देऊ किंवा वनजमीन विवादित वनक्षेत्रातून वगळू असे कधीही म्हणले नाही, परंतु तालुक्यातील ११ गावांमधील ८,६४९.८०९ हेक्टर आर. वनजमीन वनक्षेत्रातून वगळताच; आम्हीच प्रयत्न केला, म्हणुन जनतेला खोटेनाटे सांगून आरडाओरड करीत आहे.

             महेश देवकते, भाजयुमो.जिल्हाध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा

आमदार भोंगळे यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रचारसभेत जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. यामध्ये वनजमिनीचा प्रश्न, जमिनीच्या पट्टयांचा प्रश्न आणि रखडलेल्या सिंचन तलावांच्या कामांना गती देण्याचा समावेश होता.

विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत कुठल्याच पक्षाने किंवा उमेदवारांने जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी साधा एक अक्षरही वचननामा दिला नव्हता केवळ भाजपचे आमदार देवराव भोंगळे यांनी प्रचार सभेत जाहिरपणे रखडलेले प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगितले होते आणि निवडणूक जिंकताच जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला, अधिवेशनात लक्षवेधले, त्यांच्या कणखर प्रयत्नांमुळे एकूण ३३,४८६ हेक्टर आर जमीन विवादित वनक्षेत्रापैकी ११ गावांमधील ८,६४९.८०९ हेक्टर आर. जमीन वनक्षेत्रातून मुक्त करण्यात यश मिळाले आहे.

हा निर्णय तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरला असून, यामुळे त्यांच्या जमिनीवरील कायदेशीर अडचणी दूर होणार आहेत. आमदार भोंगळे यांच्या कार्याची प्रशंसा करत शेतकऱ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये