यशवंतराव शिंदे विद्यालयाचा १९ वर्षे वयोगटातील व्हाॅलीबॉल संघ जिल्हास्तरावर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन भद्रावती केले आहे.
तालुकास्तरीय व्हाॅलीबाॅल क्रीडा स्पर्धा तालुका स्टेडियम मध्ये आयोजित करण्यात आले. यात यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील १९ वर्षे वयोगटातील मुलांच्या व्हाॅलीबाॅल संघाने प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून विजय संपादन केले, व तालुक्यात अव्वल ठरले. आता हा संघ जिल्हास्तरीय व्हाॅलीबाॅल क्रीडा स्पर्धेत भद्रावती तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
तालुकास्तरीय व्हाॅलीबाॅल स्पर्धेत विजय संपादन करून जिल्हास्तरावर प्रतिनिधित्व करणाऱ्या या विजयी व्हाॅलीबाॅल संघाचे भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे अध्यक्ष, डॉ विवेक शिंदे, सचिव डॉ. कार्तिक शिंदे, सहसचिव डॉ. विशाल शिंदे, विश्वस्त माजी प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे, प्राचार्य डॉ. सुधीर मोते यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी भद्रावती, प्रा. रमेश चव्हाण, डॉ. ज्ञानेश हटवार, किशोर ढोक, समस्त प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले, व पुढील स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.