ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दुर्गापुर ग्रा.पं. कर्मचाऱ्याचे थकीत वेतन आणि भविष्य निर्वाह निधी तात्काळ खात्यात जमा करा!

दोषी सचिव जेंगठे यांची बदली व निलंबनाची कार्यवाही करा : संतोष पारखी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.

जि. प. मुख्य कार्यपालन अधिकारी जॉन्सन व उपमुख्य कार्यपालन अधिकारी कलोड़े यांच्या कडे निवेदनाद्वारे केली मागणी

 येथील दुर्गापुर ग्रा.पं. कर्मचाऱ्याचे गेल्या 10 महिन्याचे अर्थात ऑक्टोबर 2022 पासून मासिक वेतन देण्यात आलेले नसून कर्मचाऱ्याचे 18 महिन्यापासून भविष्य निर्वाह निधी कपात करुन देखील तो भविष्य निर्वाह निधी कर्मचाऱ्याच्या खात्यात जमा न करण्यात आल्यासंदर्भात ग्रा. पं. चे सर्व कर्मचारी दि.17/08/2023 पासून असहकार आंदोलन केले. आपण सदर विषयाची तात्काळ दखल घेवून दोषी ग्रा. पं. चे सचिव अशोक जेंगठे यांची बदली व निलंबनाची कार्यवाही करुन ग्राम पंचायत, कर्मचाऱ्याचे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात येण्याची मागणी शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी यांची जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी जॉन्सन व उपमुख्य कार्यपालन अधिकारी कलोड़े यांना प्रत्यक्ष भेट घेवून करण्यात आली.

ग्राम पंचायत, दुर्गापुरचे निष्क्रीय सचिव अशोक जेंगठे यांनी कर्मचाऱ्याचे नियमित वेतन देण्याचे नियोजन न केल्यामुळे गेल्या 10 महिन्याचे मासिक वेतन थकीत ठेवून सर्व कर्मचाऱ्याचे 18 महिन्यापासून भविष्य निर्वाह निधी कपात करुन देखील तो ऑक्टोबर 2022 पासून ते जुलै 2023 पर्यंतचा भविष्य निर्वाह निधी कर्मचाऱ्याच्या खात्यात जमा करण्यात आला नाही. कर्मचाऱ्याचे वेतन वेळेवर करुन त्यांच्या भविष्य निर्वाह निधी दरमहा नियमित भरणे आवश्यक असताना सुद्धा सचिव अशोक जेंगठे यांनी भरला नाही. आज सर्व ग्राम पंचायत कर्मचारी यांच्यावर उपासमारीची पाळी आली असून भविष्यात त्यांच्या हातून अनुचित प्रकार देखील घडू शकतो.

त्याचप्रमाणे ग्रा. पं.चे सचिव अशोक जेंगठे यांना गावातील विकास व कर्मचाऱ्याचे हित महत्वाचे नसून आर्थिक स्वार्थ कसा करता येईल? याचीच जास्त काळजी असते. सदर वृत्तिमुळे यासंदर्भात वरिष्ठ पातळीवरून सचिव अशोक जेंगठे यांच्यावर आर्थिक व्यवहारात अपरातफरी बाबत कारणे दाखवा व कार्यवाही सुरु आहे. ग्राम पंचायत, दुर्गापुर येथील कर्मचारी सदर विषयाच्या मागणीसाठी ग्रा. पं. चे सर्व कर्मचारी दि.17/08/2023 पासून असहकार आंदोलन केले असून आपण सदर विषयाची तात्काळ दखल घेवून दोषी ग्रा. पं. चे सचिव अशोक जेंगठे यांची बदली व निलंबनाची कार्यवाही करुन ग्राम पंचायत, कर्मचाऱ्याचे थकित वेतन व भविष्य निर्वाह निधीचा प्रश्न तात्काळ मार्गी लावुन त्यांना न्याय देण्यासंदर्भात उपमुख्य कार्यपालन अधिकारी कलोड़े यांना प्रत्यक्ष भेट घेवून करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये